शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बोंडअळीच्या आक्रमणाने बीटी कपाशीची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:25 IST

बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली.

ठळक मुद्देशेतकºयांच्या चिंतेत वाढ : उत्पादनात घट येण्याची शक्यता, उत्पन्नापेक्षा ठरणार खर्चच अधिक

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली. काही वर्षे कंपन्यांचा दावा खरा ठरला; पण मागील वर्षीपासून बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. यंदाही बीटी बोंडअळीने कपाशीची चाळणी केली आहे. अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने शेतकºयांची चिंता मात्र वाढली आहे.नॉन बीटी कपाशी बियाण्यांवर रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. आलेली पाती गळून जाते. उत्पादनात मोठी घट येते. यामुळे शेतकºयांनी घरची सरकी गाळून तिचा बियाणे म्हणून वापर करण्याला सोडचिठ्ठी देत शासन व कंपन्यांच्या जाहीरातबाजीला बळी पडत महागडे बीटी कपाशी बियाणे वापरण्याची मानसिकता केली. ही बाब हेरून धर्मा, राशी, भक्ती, विठ्ठल, अजीत अशा नानाविध कंपन्यांनी बीटी बियाण्यांची निर्मिती केली. उत्पादन खर्च ५०० च्या आत असला तरी कृषी विभागाच्या अधिकाºयांना चिरीमीरी देत एमआरपी ९५० पर्यंत वाढवून घेतली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत शेतकºयांनी ४५० ग्रॅम बियाण्यांसाठी ९५० रुपये मोजले. ही बाब शेतकºयांची लूट करणारी असल्याचे उशीरा लक्षात आल्याने शासनाने कंपन्यांना भाव कमी करण्याची विनंती केली. कंपन्यांनी विनंती अमान्य केल्यावर शासकीय बडगा उगारून बियाण्यांचे भाव ७०० ते ७५० रुपयांवर आणले. भाव अधिक असले तरी फवारणीचा खर्च कमी येणार व रोग प्रतिकारक शक्ती बºयापैकी असल्याने राज्यातील समस्त शेतकºयांनी सर्व वाणांना दूर सारत बीटी बियाण्यांचा वापर केला. आता मात्र या वाणाच्या कपाशीवर सर्वच प्रकारचे रोग येत आहे.पांढरी माशी व बोंडअळी यांना हे वाण मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. कंपनीकडे विचारणा केली असता ते आता या वाणातील ‘सिन्ड्रोम’ कमजोर झाला. किडींची प्रतिकार शक्ती वाढली. यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे म्हणून हात झटकत आहे. यंदा कपाशी समाधानकारक दिसत असली तरी केवळ झाडांची केवळ वाढ झाली आहे. बोंडाची संख्या नगण्य आहे. पांढरी माशी व बोंडअळीच्या परिणामाने पाती, फुल व बोंडे गळत आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट येणार आहे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्नवाढ यापेक्षा उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्नही कमी हे सूत्र स्वीकारून शेतकºयांना लाभ देण्याकरिता शासनाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.अन्यथा बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करावेबियाण्यांतील रोगप्रतिकारक घटक कमजोर झाला असेल तर नवीन संशोधन करून रोगांना बळी न पडणारे वाण कंपन्यांनी बाजारात आणणे गरजेचे होते; पण असे न करता जुन्याच तंत्रज्ञानाने बियाणे तयार करून शेतकºयांना लुटण्याचे धोरण कंपन्यांनी स्वीकारले आहे. शासनाने भाव कमी करण्यासाठी दबाव तंत्र वापरले. आता कंपन्यांनी रोगांना बळी न पडणारे बियाणे रास्त भावात निर्माण करण्यासाठी दबाव टाकावा. अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.