शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

ब्रिटीशकालीन कारागृह दीडशे वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:51 PM

ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते.वर्धा जिल्हा कारागृहाची स्थापना ब्रिटीशांच्या राजवटीत सन १८६७ मध्ये झाली होती. त्यावेळी कारागृहाला वर्ग ३ चा दर्जा देण्यात आला होता; परंतु, सन १९९४ मध्ये या कारागृहाला वर्ग १ चा दर्जा देण्यात आला. सदर कारागृहाची बंदी क्षमता २५२ असून सध्यास्थितीत तेथे नऊ महिलांसह एकूण ३४३ कैदी आहेत. महिला बंदी कारागृहात दाखल झाल्यावर त्यांचे अ‍ॅडमिशन करून महिला विभागात महिला कर्मचारी व महिला तुरुंग अधिकारी याच्या उपस्थितीत अंग झडती घेण्यात येते. त्याच वेळी त्याची मेडीकल हिस्टी जाणून घेत गंभीर आजार असल्यास त्याची नोंद घेतली जाते. इतकेच नव्हे तर महिला बंदींच्या मासिक पाळीची तारीख विचारून त्यांना सॅनिटरी नॅपकीन पुरविल्या जाते. तसेच त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून ज्यांची कुवत वकील करण्याची नाही त्यांना शासनातर्फे वकील पुरविण्याची व्यवस्था करून दिली जाते. उत्कृष्ट भोजन, बंदीवानांच्या माहितीत भर टाकण्यासाठी विविध विषयांची पुस्तके या कारागृहात बंदीवानांसाठी आहेत.सुदृढ आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून बंदीवानांकडून दररोज योग व व्यायाम करून घेतल्या जातो. महिला बंदीवानांना सामाजिक संघटनांच्या मदतीने स्वयंरोजगारा संबंधिचे प्रशिक्षणही दिले जात असून यात शिवणकाम, ब्युटी पार्लर, रांगोळी रेखाटणे, मेहंदी रेखाटणे आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून बंदीवानांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्नच केला जातो.सुरक्षेच्या दृष्टीने दारूगोळाही पुरेसाचसदर कारागृहात अधिकारी व कर्मचारी असे ५१ मनुष्यबळ मंजूर आहे. त्यापैकी सध्यास्थितीत तुरुंगाधिकारी श्रेणी २ हे एक पद रिक्त असून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून या कारागृहात पुरेसा दारूगोळा व शस्त्रसाठा उपलब्ध असल्याचे समजते.सुमारे चार हेक्टर शेतीयेथील कारागृहाचे एकूण क्षेत्रफळ ६ हेक्टर ४३ आर असून त्यापैकी ३ हेक्टर ९४ आर जमिनीवर बंदीवानांकडून शेती करून घेतली जाते. तर २ हेक्टर ४९ हेक्टर जमीन कारागृह परिसर क्षेत्र म्हणून असल्याचे सांगण्यात आले.विनोबांसह १७ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा कारावासस्वातंत्र्य लढ्याच्या काळात इंग्रजांनी याच कारागृहात आचार्य विनोबा भावे, शिवराज चुडीवाले, गोपालराव काळे, किशोरीलाल मश्रुवाला, काका कालेलकर, प्रोफेसर भनसाली, श्रीकृष्णदास जाजू, राधाकृष्ण बजाज, कृष्णदास गांधी, आर्य नायकम, तेजराम राघवदास, सदाशिव गंद्रे, आशादेवी आर्यनायकम, डॉ. मुजुमदार, देवचंद्र रामचंद्र, जानकीदेवी बजाज, जे. सी. कुमारप्पा यांनी कारावास भोगला आहे.

टॅग्स :jailतुरुंग