शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गावर गुदमरतोय नागरिकांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

न्यू इंग्लिश शाळेमागील रहदारीच्या रस्त्यालगत जुनी विहीर आहे. या परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासह विहिरीवर जाळी बसवून संरक्षित करण्याची मागणी नगरसेविका रंजना पट्टेवार यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजागेचे सौदर्यीकरण करण्यासह विहीर सरंक्षित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : न्यू इंग्लिश शाळेमागील रहदारीच्या रस्त्यालगत जुनी विहीर आहे. या परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासह विहिरीवर जाळी बसवून संरक्षित करण्याची मागणी नगरसेविका रंजना पट्टेवार यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.न्यू इंग्लिश हायस्कूलमागील विहीर अतिशय जुनी असून या विहिरीत यापूर्वी अनेकांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. सद्यस्थितीत या विहिरीसह परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. या घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे व्यावसायिकांसह रहिवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयीही प्रश्न निर्माण झाला आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना अक्षरश: नाकाला रुमाल लावून लावे लागते. यापूर्वी अनेकवार याविषयी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, उपाययोजना करण्यात नगर प्रशासन उदासीन आहे. या विहिरीची स्वच्छता करून पाणी हे केवळ सार्वजनिक बांधकामाकरिता वापरण्यात यावे, विहिरीवर जाळी बसविण्यात यावी, जागेचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली असून सात दिवसांत समस्या निकाली काढण्यात यावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा नगरसेविका पट्टेवार यांनी मुख्याधिकाºयांना निवेदनातून दिला आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावरअस्वच्छता असलेल्या परिसरात न्यू इंग्लिश हायस्कूलसह बापट शाळा, अग्रगामी कॉन्व्हेंट, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, खासगी रुग्णालये, हॉटेल्स आहे. शाळांमध्ये हजारावर विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी प्रश्न निर्माण झाला असताना नगरपालिकेचा स्वच्छता विभाग कुंभकर्णी झोपेत आहे.