शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बोरच्या अधिकाऱ्यांची सारवासारव

By admin | Updated: June 11, 2014 00:13 IST

बोर अभयारण्यात असलेल्या प्राण्यांची १४ मे बुद्धपोर्णीमेला प्रगणना झाली़ ढगाळ वातावरण, अचनाक आलेल्या पावसाच्या सरी व जंगलात पसरलेला काळोखा यामुळे प्रगणनेत अडथळा आला़ उभारलेल्या मचाणी व पाणवठे

ढगाळी वातावरणात प्रगणना फसल्यावरही दिसले पाच वाघप्रफुल्ल लुंगे - सेलूबोर अभयारण्यात असलेल्या प्राण्यांची १४ मे बुद्धपोर्णीमेला प्रगणना झाली़ ढगाळ वातावरण, अचनाक आलेल्या पावसाच्या सरी व जंगलात पसरलेला काळोखा यामुळे प्रगणनेत अडथळा आला़ उभारलेल्या मचाणी व पाणवठे यांच्यातील जास्त अंतर व त्या आंधारात काहीही न दिसल्याने प्रगणना फसली़ तरीही प्रगणना यशस्वी होवून त्यात पाच वाघ दिसल्याची माहिती पसरवून अधिकारी सारवासारव करीत आहेत. बोरच्या अधिकाऱ्यांचा हा खोटारडेपणा ‘लोकमत’ने उजेडात आणला. यामुळे हा खोटारडेपणा करून अधिकारी स्वत:चा बचाव करीत असल्याचा आरोप होत आहे. बोर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी, पक्षी सोबतच वाघ, बिबटही आहे़ म्हणूनच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू आहे़ बोर अभयारण्याच्या नैसर्गिक परिसर, विपुल वनसंपदा बोर अभयारण्याकडे पर्यटकांची पावले खेचून आणते; मात्र बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या बेपर्वावृत्तीमुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत असून त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़बोरधारणाच्या राममंदिर परिसरात नित्यनेमाने दररोज संध्याकाळी ६़३० ते ७ वाजताच्या दरम्यान एक वयस्क वाघ पर्यटकांसह सर्वांना हमखास दिसायचा़ यंदाचा उन्हाळा संपत असतानाही दररोज दिसणारा पट्टेदार वाघ दिसला नाही़ तो बेपत्ता झाल्याची चर्चा झाली़ हा वाघ शिकाऱ्यांकडून मारण्यात आल्याची किंवा शेतकऱ्यांनी शेताच्या कुंपनात सोडलेल्या वीज प्रवाहाच्या स्पर्शाने ठार झाल्याची व त्याचा मृतदेह रफादफा केल्याची दबक्या आवाजात अधिकारी, कर्मचारी व लोकांमध्ये चर्चा सुरू झाली़व्याघ्र गणनेत ‘त्या’ वाघाचा शोध लागेल अशी आशा होती़ मात्र प्रगणनाच फसल्याने वाघाचा शोध लागला नाही़ हे प्रकरण शेकणार म्हणून अयशस्वी प्रगणनेला खरेपणाचे बनावट स्वरूप देत जंगलात पाच वाघ व इतर प्राण्यांची १४ मेच्या प्रगणनेत नोंदीचा अहवाल बनवून स्वत:सह सर्वांची फसगत केली. लबाड अधिकाऱ्यांनी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतल्याने बोर अभयारण्याचे व त्यांना पाठीशी घालणारे लांडगे किती लबाड आहे हे उघड झाले़ हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर सत्य शोधण्यासाठी गेल्यावर सर्वांचा खोटारडेपणा उघड होईलच हे नक्की़