शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे ते विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे.

ठळक मुद्देसुधीर दिवे : राजकीय हेतूनेच काँग्रेससह विरोधी पक्ष करताहेत विरोध, मोदी सरकार शेतकरीहितार्थ निर्णय घेणारे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारने शेतकरी हितार्थ आणलेले विधेयक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनाही स्वातंत्र्य देणारेच आहे. पण काँग्रेससह इतर विरोधक राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून संभ्रम पसरवून त्याला विरोध करीत असल्याची टीका आयोजित पत्रकार परिषदेतून भाजपचे महासचिव सुधीर दिवे यांनी केली.दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्याला हात न लावता शेतकरी हितार्थ हे विधेयक आहे. पण कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलविणाऱ्या या विधेयकांना काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. या नवीन विधेयकांना कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना अन्यही पर्याय उपलब्ध होणार आहेत. शिवाय शेतकºयांकडील शेतमाल खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होणार आहे. एकूणच याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. असे असले तरी विरोधकांकडून विविध अफवा पसरविल्या जात आहेत. विधेयकाला कायद्याचे स्वरूप मिळाल्यावर शेतकरी जो पिकवेल त्याबाबत करार होईल. पण शेतजमीन जाणार अशी अफवा पसरविली जात आहे. वास्तविक पाहता निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जे नमुन केले होते त्यापैकी शेतकरी हिताचे असलेले विषय केंद्रातील मोदी सरकार मार्गी लावत आहे. पण या विधेयकांना काँग्रेसही विरोध करीत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे, अविनाश देव, माधव चंदनखेडे, पवन परियाल, राजेश बकाने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारagricultureशेती