शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अनुराधा पौडवाल गाणार बापूंची आवडती भजने

By admin | Updated: January 29, 2015 23:12 IST

महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी स्वच्छ भारत

वर्धा : महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल बापूंना आवडत्या भजनातून संगीतमय आदरांजली अर्पण करणार आहे. स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे सेवाग्रामसह स्वच्छ वर्धा या संकल्पनेची सुरुवातही सेवाग्रामातून शुक्रवारपासून होत आहे. यात सकाळी ९ वाजता भक्तीसंगीतचा कार्यक्रम आयोजित आहे.महात्मा गांधी यांचे सेवाग्राम येथे १२ वर्षे वास्तव होते. याच काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेवाग्राम हे देशातील प्रमुख केंद्र बनले होते. कुटीरोद्योगाच्या माध्यमातून गावाचा विकास तसेच स्वच्छतेचा संदेशही महात्मा गांधी यांनी येथूनच दिला असल्यामुळे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी सांस्कृतिक केंद्रातर्फे भक्ती संगीत तसेच स्वच्छ वर्धा अभियानाचे सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्र संचालक डॉ. पियुष कुमार यांनी दिली. पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे भजनगायन वर्धेकरांना अनुभवता येणार आहे. त्या सकाळी ९.३० ते ११ या वेळेत महात्मा गांधीजींना प्रिय असलेल्या भजनांचे गायन करतील. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सकाळी ११ वाजता स्वच्छ वर्धा अभियानाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)