शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

बापटनगरात घरफोडी

By admin | Updated: February 25, 2017 00:44 IST

काही दिवसांपासून शहरात ब्रेक बसलेल्या चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना

रोख व सोन्याच्या ऐवजासह ३.५४ लाखांचा मुद्देमाल लंपास वर्धा : काही दिवसांपासून शहरात ब्रेक बसलेल्या चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख व सोन्या चांदीच्या ऐवजासह रोख असा एकूण ३ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बापटनगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघड झाली. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी चोरट्यांच्या हाताचे ठसेही घेण्यात आले. श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. शिवाय चोरट्यांनी कुठलाही सुगावा ठेवला नसल्याने चोरटे नेमके कोण आणि कुठे पळाले याचा कुठलाही पत्ता पोलिसांना मिळाला नाही. पोलीस सुत्रानुसार, राजेश चौधरी हे कुटुंबियांसह घरातील हॉलमध्ये झोपून होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने शयनकक्षातील आलमारीतून २० हजार रुपये रोखसह सोन्याचा ऐवज असा एकूण ३ लाख ५४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे चौधरी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. वर्धेत घडलेल्या बऱ्याच चोऱ्या अद्याप उघड झाल्या नसून यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)