शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाविरूद्ध बँकांचा संप

By admin | Updated: March 1, 2017 00:52 IST

आता बँकांमध्ये खासगीकरणाचा शिरकाव होत आहे. बहुतांश पदे ‘आऊट सोर्स’ करण्यात येत असल्याने बँकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.

कोट्यवधीचे व्यवहार ठप्प : खातेदार, व्यापाऱ्यांना फटका वर्धा :आता बँकांमध्ये खासगीकरणाचा शिरकाव होत आहे. बहुतांश पदे ‘आऊट सोर्स’ करण्यात येत असल्याने बँकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. याविरूद्ध बँक अधिकारी, कर्मचारी संघटना एकवटल्या. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने मंगळवारी याविरूद्ध संप पुकारण्यात आला. परिणामी, दिवसभर बँका बंद होत्या. यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले. खातेदार, व्यापारी, शेतकऱ्यांना याचा मोठाच फटका बसला. शासनाकडून आता बँकांच्या धोरणात बदल केला जात आहे. बँकांमध्येही खासगीकरण केले जात आहे. कर्मचाऱ्यांची भरती करताना कंत्राट पद्धतीवर वा कंत्राटदार कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचे धोरण आखले जात आहे. या धोरणाचा युनियनकडून विरोध केला जात आहे. शिवाय नोटबंदीच्या कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ काम करावे लागले. या काळातील भत्ता देण्यात यावा. या कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना गोंधळाच्या स्थितीमुळे जवळचा पैसा बँकेत भरावा लागला. ही रक्कम कर्मचाऱ्यांना माफ करण्यात यावी. इनकम टॅक्समध्ये बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्णत: सुट देण्यात यावी. वेतनवाढ निश्चितीची प्रक्रिया जलद गतीने राबवावी. भरती प्रकियेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. बँकांतील सर्व प्रकारची पदे भरावीत. बँकांचे कामकाज पाच दिवसांचे करावे, कर्ज थकविणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईची परवानगी द्यावी, आदी मागण्या या संपाद्वारे लावून धरण्यात आल्या आहेत. नऊ संघटनांचा समावेश असलेल्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने हा संप पुकारण्यात आला. शहरातील बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बँकांसमोर गोळा होत शासनाच्या या धोरणांचा निषेध केला. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी बँक सुरू होत्या व आज संप असल्याने ग्राहकांना फटका बसला. अनेकांना आज कुठलेही व्यवहार करता न आल्याने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)