शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या हलगर्जीने रूग्णाच्या गळ्यातच बँडेज पट्टी

By admin | Updated: June 20, 2017 01:07 IST

सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीने एका रुग्णाचा जीव धोक्यात आला आहे.

सेवाग्राम रूग्णालयाचा अफलातून कारभारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीने एका रुग्णाचा जीव धोक्यात आला आहे. आॅपरेशन दरम्यान या डॉक्टरच्या हलगर्जीने सुमारे एक फूट लांबीची बँडेज पट्टी रूग्णाच्या गळ्यातच राहिली. यासंदर्भात रूग्णाच्या आईने केलेल्या धावपळीमुळे डॉक्टरांनी आपली चूक पदरात घ्या, असे म्हणत त्या रूग्णाचे पुन्हा आॅपरेशन करून गळ्यातील पट्टी काढली. मात्र या अनागोंदित रूग्णाचा जीव टांगणीला लागला होता. हा प्रकार घडलेला रूग्ण कुणाल मिश्रा याच्या आईशी संपर्क साधला असता त्यांनी एक घटनेत कुणालच्या नाकाचे हाड तुटल्याचे सांगितले. या उपचाराकरिता त्याला सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान १६ जूनला सकाळी कुणालचे आॅपरेशन करण्यात आले. आॅपरेशननंतर दुपारी कुणालला त्याच्या खाटेवर टाकले असता त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्याला होश आल्यानंतर तो इशाराने काहीतरी सांगत असल्याचे दिसून आले. याबाबीकडे परिचारिका दुर्लक्ष करित होते. दरम्यान परिचारिकेने अंदाज लावत आॅपरेशन दरम्यान काहीतरी गडबड झाल्याचा संशय डॉक्टरांकडे केला. त्यावरून डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्या गळ्यात बँडेज पट्टी असल्याचे दिसून आले. त्यात पुन्हा आॅपरेशन करून पट्टी काढण्यात आली. विभाग प्रमुखाला ४८ तासात ही माहिती नाहीसेवाग्राम रूग्णालयात नाक, कान, घसा विभागाचे प्रमुख डॉक्टर नागपुरे यांनी शनिवारी झालेल्या या अनागोंदीची विचारणा केली असता याप्रकारात आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.