शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बळीराजांनो..! आता रडायचं नाही तर लढायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:04 IST

अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विधवांचं ‘तेरवं’: रंगभूमीवर साकारली संघर्षगाथा

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर विधवा ही रणरागीणी बणून घराचा अख्खा भार तोलते. तिच्या याच संघर्षाची ही गाथा ‘तेरवं’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर साकारण्यात आली आहे. यातून ‘बळीराजांनो...!आता रडायच नाही तर लढायचं’ असे आवाहन करण्यात आले आहे.कृषीप्रधान देशातील शेतकरी समाजातील दुर्लक्षीत घटकच म्हणावा लागेल. शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकºयांचा बळी घेतल्या जात आहे. शेतकरी हा स्वाभिमानी असल्याने कर्जाचा वाढता डोंगर सर करण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते. संसाराचा गाडा, मुलांचे शिक्षण, मुलींचा विवाह आणि आजारपणावर उपचार या सर्वांची घडी बसवितांना तो हतबल होतो. यातूनच नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग स्विकारावा लागतो. शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असतांनाही याचे सरकारला सोयरं सुतक नाही. शेतकरी निघून गेल्यानंतर घराबाहेर पाय न ठेवणारी महिलाही कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्व दु:ख गिळून खंबीरपणे उभी राहते. तेव्हापासून तिच्या खºया संघर्षाला सुरुवात होते.परिवाराचा सांभाळ, समाजाच्या पडणाºया नजरा या सर्व आघातावर वार करुन पुन्हा आपलं नवी विश्व निर्माण करते. हीच संघर्षगाथा महिलांनी या नाटकातून साकारली.तेरा पात्रांनीच साकारल ‘तेरवं’विदर्भातील अध्ययन भारती परिवार आणि अ‍ॅग्रो थिएटर, वर्धा या संस्थांच्या मदतीनं हे नाटकं रंगभूमीवर आलं आहे. संवेदनशील आणि सामाजिक भान जोपासणारे लेखक श्याम पेठकर यांनी हे नाटक लिहिले असून याचं दिग्दर्शन नाट्यकर्मी हरीश इथापे यांनी केलं आहे. या नाटकात वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागातील पाच विधवा आणि त्याच परिवारातील दोन मुलींचा समावेश आहेत. तर या संस्थेतील सहा जणींनी सहाय्यक भूमिका साकारल्या असून एकूण तेरा पात्रांनी काम केलं आहे. या नाटकात लोकगीतांचा वापर केला असून हे संगीत विरेंद्र लाटनकर यांनी दिले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग चंद्रपुरला झाला असून चांगला प्रतिसादही मिळाला.जे भोगलं, जे सोसलं ते रंगभूमीवर अवतरलंया संवेदनशील नाटकात आत्महत्याग्रस्त परिवारातील विधवांनी घरचाकर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांनी एकाकी जीवनात जे भोगलं, जे सोसलं तेच ‘तेरवं’ या नाटकातून रंगभूमीवर मांडल आहे. त्यासाठी या महिलांना खास नाट्य प्रशिक्षणही देण्यात आलं. वर्ध्यालगतच्या रोठा येथील ‘अ‍ॅग्रो थिएटर’ येथे दोन ते अडीच महिने परिश्रम घेतले. यातील महिला कलाकारांनी अक्षत तृतीया, दसरा असो वा दिवाळी; सर्व सण तालीम करीत.घरचा कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर महिलेच्या वाट्याला येणाºया संघर्षाचे जाणीव या नाटकातून होते. समाजातील हरवत असलेल्या माणूसकीला जागं करणारं हे नाटक असून शासनाने व समाजाने हे दु:ख समजून घ्यावं.हरीष इथापे, नाट्य दिग्दर्शक, वर्धा.