शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबा फरीद दर्गाह टेकडीला आग

By admin | Updated: April 30, 2017 01:03 IST

येथील बाबा फरीद दर्गाह टेकडी परीसरात आग लागली. या आगीवर ताबा मिळविण्याकरिता तब्बल ८ तास परीश्रम घ्यावे लागले.

आठ तासांच्या परिश्रमानंतर आगीवर ताबा : आगीत कुठलीही हानी नाहीगिरड : येथील बाबा फरीद दर्गाह टेकडी परीसरात आग लागली. या आगीवर ताबा मिळविण्याकरिता तब्बल ८ तास परीश्रम घ्यावे लागले. याकरिता गावकरी आणि दोन अग्निशमन बंबामुळे आग आटोक्यात आणणे सोपे झाले. या आगीत कुठलाही जीवित हानी नाही. ही घटना गुरुवारी घडली. प्राप्त माहीतीनुसार, गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान वनविभागाच्या हद्दीतील टेकडी परिसरात खुर्सापार रस्त्याच्या कडेला आग लागली. ही माहिती गावात पोहचताच युवकांनी टेकडीकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाता पहाता आगीने उग्ररुप धारण केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही अपयश आले. घटनेची माहिती पोलीस आणि तहसील कार्यालयाला देण्यात आली. पोलिसांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. या आगीत परिसरातील गवत, झाडे, झुळपांची राख झाली. यावेळी गिरडचे ठाणेदार बी. डी. मसराम हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. घटनास्थळी जिल्हा परीषद सदस्य डॉ महैश गौर, पंचायत समिती सदस्य शेख ईस्राइल, सरपंच चंदाताई कांबळे, उपसरपंच विलास तडस पोहचले. शनिवारी गिरड वनविभाग कार्यालयचे सहायक वनपरीक्षेत्र अधिकारी एम.ओ. राऊत, वनरक्षक वाशिमकर, धारने यांनी घनस्थळ गाठत पंचनामा केला. (वार्ताहर) अग्निशमन बंबाकरिता पालकमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप परिसरात आग लागल्याची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली; मात्र त्यांच्याकडून बंब पाठविण्याबाबत टाळाटाळ केली. यामुळे येथील युवक अजय इंदुरकर, विलास तडस, नामदेव चुटे, राजू चामचोर, उपसरपंच विजय तडस सरपंच चंदाताई कांबळे यांनी थेट या प्रकाराची माहिती वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली. त्यांनी वेळीच याची दखल घेत प्रशासनाला धारेवर धरले. त्यांची हस्तक्षेप केल्यानंतर हिंगणघाट आणि सिंदी (रेल्वे) येथील अग्निशमन दल पाठविण्यात आले.