शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’च्या कामांची माहिती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

भूमिगत गटार योजनेची कामे तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र, शहरातील पक्के रस्ते फोडून तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्तो फोडल्याने गांधी जिल्ह्याला विद्रुप करण्याचे काम न.प.ने केले आहे. ताराचंद चौबे यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील भूमिगतच्या कामाची संपूर्ण माहिती आरटीआयच्या अर्जाद्वारे मागितली होती. मात्र, अद्यापही माहिती न.प.ने दिली नसल्याने कामात गैरप्रकार झाल्याचा संशय बळावत आहे.

ठळक मुद्देआरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांचा आरोप : सहा महिने उलटूनही अर्जाकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात मागील दोन वर्षांपूर्वीपासून सुरु झालेल्या भूमिगतच्या कामांची संपूर्ण माहिती आरटीआय कार्यकर्ता ताराचंद चौबे यांनी न.प.कडे मागितली. मात्र, आज सहा महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने न.प.च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भूमिगतच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चौबे यांनी केला आहे.भूमिगत गटार योजनेची कामे तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र, शहरातील पक्के रस्ते फोडून तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्तो फोडल्याने गांधी जिल्ह्याला विद्रुप करण्याचे काम न.प.ने केले आहे. ताराचंद चौबे यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील भूमिगतच्या कामाची संपूर्ण माहिती आरटीआयच्या अर्जाद्वारे मागितली होती. मात्र, अद्यापही माहिती न.प.ने दिली नसल्याने कामात गैरप्रकार झाल्याचा संशय बळावत आहे. चौबे हे दररोज न.प.चे उंबरठे झिजवत माहिती मागण्यास जात असून त्यांना कोरोनाचे काम आहे, असे उत्तर देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनाही तक्रार दिली. पण, तरीदेखील याची दखल घेण्यात आली नाही. शहरातील आंबेडकर पुतळा ते बजाज चौक, शिवाजी चौक ते आर्वी नाका तसेच कारागृहासमोरील नवीन रस्ता बांधकाम होवून १० वर्षेही नाही उलटले तोच पुन्हा रस्ता फोडण्यात आला असून सामान्य नागरिकांचे कोटी रुपयांचे नुकसान नगरपालिका करीत आहे. चांगले रस्ते मधातून फोडून ते तसेच ठेवत आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्त करण्यास सांगितले असता त्यांच्याकडून आम्हला परमीशन नसल्याचे उत्तर मिळते. रस्ता खोदकामामुळे बिएसएनएलचे केबल आणि नगरपालिकेचे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. यासंपूर्ण विद्रुपीकरणारा नगरपालिका जबाबदार असून दोषी विभागावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच बजाज चौकातील उड्डाणपूलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून पूर्णच झाले नसून या मार्गावरील समस्या जैसे थेच आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असुन कोटी रुपये पाण्यात गेले आहे. याकडे मात्र, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता ताराचंद चौबे यांनी केली आहे.अनेकांचे अपघात दुचाकींचे पार्ट खिळखिळेशहरात दोन वर्षांपूर्वी भूमिगतच्या कामांना सुरुवात करण्यात आली. यामध्ये गटार योजना आणि नळ योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले. यासाठी शहरातील चांगल्या दर्जाचे रस्ते मधातून फोडण्यात आले. खोदलेली माती रस्त्यावरच पसरविल्यामुळे अनेकांचे अपघात झाले असून खडतर रस्त्याने प्रवास सुरु असल्याने अनेकांच्या दुचाकींचे पार्ट्स खिळखिळे झाले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका