भटक्या कुत्र्यांचा संपर्क टाळा, त्वचारोगाचा वाढतोय धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:49 IST2026-02-10T19:46:49+5:302026-02-10T19:49:55+5:30

Vardha : भटक्या कुत्र्यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे लहान मुले आणि वृद्ध यांच्यासह हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षभरात जवळपास दोन हजारांवर नागरिकांना कुत्रे चावा घेतात.

Avoid contact with stray dogs, the risk of skin disease is increasing! | भटक्या कुत्र्यांचा संपर्क टाळा, त्वचारोगाचा वाढतोय धोका !

Avoid contact with stray dogs, the risk of skin disease is increasing!

वर्धा : भटक्या कुत्र्यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे लहान मुले आणि वृद्ध यांच्यासह हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षभरात जवळपास दोन हजारांवर नागरिकांना कुत्रे चावा घेतात. यात लहान मुलांची संख्या अधिक असते. सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या डोकेदुखी ठरली असून आता त्यांच्यातील संसर्गजन्य आजार मनुष्याला होत असल्याने चिंता वाढली आहे. विशेषतः कुत्र्यांना होणारे त्वचारोग मानवासाठी घातक ठरतात.

भटक्या कुत्र्यांना होणारे विविध त्वचारोग

भटक्या कुत्र्यांमध्ये प्रामुख्याने 'सार्कोप्टिक मॅन्ज' याला आपण ढोबळमानाने 'गजकर्ण' किंवा 'खाज' म्हणतो. हा माइट्समुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. 'फंगल इन्फेक्शन' यात त्वचेवर गोलाकार चट्टे पडतात. 'बॅक्टेरियल पायोडर्मा' यामध्ये जखमांमधून पू येणे किंवा त्वचा लाल होते. 'टिक फीव्हर' आणि 'अॅलर्जी' गोचीड आणि पिसवांच्या चाव्यामुळे होणारे त्वचेचे विकार आहेत.

नागरिकांना कोणता धोका?

कुत्र्यांचे काही त्वचारोग 'झुनोटिक' असतात, म्हणजेच ते प्राण्यांकडून माणसांकडे सहज संक्रमित होतात. यात 'स्कॅबीज' कुत्र्यांवरील माइट्स माणसाच्या त्वचेत शिरल्यास तीव्र खाज सुटते. 'दाद किंवा रिंगवर्म' यात अंगावर लाल रंगाचे खाज सुटणारे गोलाकार चट्टे पडतात. 'अॅलर्जीक डर्मेटायटिस' कुत्र्यांच्या संपर्कात आल्याने पुरळ येणे किंवा त्वचा संवेदनशील होते.

भटक्या कुत्र्यांना त्वचारोग अधिक का?

अन्नाच्या कमतरतेमुळे कुत्र्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, सांडपाणी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वावरल्याने संसर्ग वाढतो, पाळीव कुत्र्यांप्रमाणे भटक्या कुत्र्यांचे वेळेवर लसीकरण किंवा औषधोपचार होत नाहीत. पावसाळ्यात आणि दमट हवामानात बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वेगाने होतो, परिणामी भटक्या कुत्र्यांना त्वचारोग अधिक होतो. त्यामुळे नागरिकांनी भटक्या श्वानांपासून सावध राहण्याची गरज असून योग्यवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहेत.

काय काळजी घ्याल?

अनोळखी किंवा त्वचारोग असलेल्या भटक्या कुत्र्याला स्पर्श करणे टाळा. जर संपर्क आलाच, तर त्वरित हातपाय साबणाने स्वच्छ धुवा. लहान मुलांना रस्त्यावरील कुत्र्यांशी खेळण्यापासून परावृत्त करा. परिसरातील कुत्र्याला संसर्ग झाला असल्यास स्थानिक पालिका किंवा प्राणिमित्र संघटनेला कळवा.

संपर्काचे मार्ग कोणते ?

संसर्ग होण्याचे मुख्य मार्ग म्हणजे, कुत्र्याला कुरवाळणे किंवा त्याच्या अंगाला स्पर्श करणे. कुत्री ज्या ठिकाणी बसतात उदा. पायऱ्या, बाकडी, गोणपाट त्या जागेचा वापर करणे. कुत्र्यांच्या अंगावरील पिसवा माणसाला चावल्यास संसर्ग होऊ शकतो.

"भटक्याच नाही तर पाळीव कुत्र्यांमधील 'मॅन्ज' किंवा 'फंगल इन्फेक्शन' हे मानवी त्वचेसाठी संसर्गजन्य असू शकतात. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना याचा धोका जास्त असतो. हे इन्फेक्शन लवकर बरे होत नाही. त्यामुळे कुत्र्याच्या संपर्कात आल्यावर अंगाला खाज सुटली किंवा चट्टे दिसले, तर घरगुती उपाय न करता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या."
- डॉ. स्नेहल कावलकर (बेले), त्वचारोगतज्ज्ञ

Web Title : आवारा कुत्तों से बचें: त्वचा रोगों का बढ़ता खतरा!

Web Summary : वर्धा में आवारा कुत्ते इंसानों के लिए त्वचा रोगों का खतरा बढ़ा रहे हैं। खाज और दाद जैसे संक्रमण आसानी से फैलते हैं, खासकर बच्चों और बुजुर्गों में। विशेषज्ञों ने सावधानी और तत्काल चिकित्सा परामर्श की सलाह दी है।

Web Title : Avoid stray dogs: Rising risk of skin diseases!

Web Summary : Stray dogs in Wardha pose skin disease risks to humans. Infections like mange and ringworm are easily transmitted, especially to children and the elderly. Experts advise caution and prompt medical consultation.