शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

अतवृष्टीग्रस्तांवर आश्‍वासनांचीच खैरात

By admin | Updated: June 2, 2014 01:39 IST

गतवर्षी खरीप रोजी झालेल्या अतवृष्टीत स्थानिक भोलेश्‍वरी

रोहणा : गतवर्षी खरीप रोजी झालेल्या अतवृष्टीत स्थानिक भोलेश्‍वरी नदीच्या काठावरील अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या. यातील अनेक शेतकर्‍यांना शासनाकडून अद्यापही कोणतेच अर्थसहाय्य मिळालेले नाही. लवकरच निधी मिळेल अशी आश्‍वासनांची खैरात मात्र सुरूच आहे.

जमीन खरडून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना व त्यानंतर झालेल्या गारपीटग्रस्तांना हेक्टरी भरीव अनुदान शासनाकडून जाहीर झाले आहे. पण खरडून गेलेल्या जमिनीचे अनुदान अजूनही शेतकर्‍यांना मिळाले नाही. नुकतीच रोहणा येथील काही पीडित शेतकर्‍यांनी आर्वी उपविभागीय अधिकार्‍यांची भेट घेतली असता शासनाकडून अनुदान आल्यावर तुम्हाला देवू असे वेळ काढू आश्‍वासन दिले.

गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कित्येकांची घरे जमीनदोस्त झाली. जनावरे वाहून गेली. जीवनोपयोगी साहित्य खराब झाले. शेतातील पिके खराब झाली. रोहणा येथील भोलेश्‍वरी नदीला कधी नव्हे एवढा प्रचंड पूर आला. या पुरात १00 ते १५0 शेतकर्‍यांच्या हजारो हेक्टर जमिनीतील नुसती पिकेच नाही तर पिकांसह संपूर्ण शेतजमीन वाहून गेली. नदीतील रेती व दगड शेतात येऊन साचले. अनेकांची शेत कुंपणे, ठिंबक सिंचन साहित्य व स्प्रिंकलर संच वाहून गेले. यातील अनेक शेतजमीन आजही शेती करण्यास उपयुक्त नाही. अशा जमीन खरडून गेलेल्या शेतकर्‍यांना प्रति हेक्टर रुपये २५ हजार व कमाल र्मयादा दोन हेक्टरची असेल याप्रमाणे अनुदान मिळेल असे शासनाने जाहीर केले व अशा खरडून गेलेल्या शेत जमिनीचा महसूल विभागाने सर्व्हेदेखील केला. त्यानंतर सर्वसाधारण नुकसानग्रस्तांना शासनाचे अनुदान मिळाले.

जनावरे वाहून गेली अशा नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळाली. घरे पडली किंवा जीवनोपयोगी वस्तू खराब झाल्या अशा पीडितांनाही शासनाने आणि काही स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी आर्थिक मदतीचे वाटप केले. पण ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या अशा पीडितांना शासनाची मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे डिसेंबर-जानेवारी मध्ये व त्यानंतरही झालेल्या गारपीट ग्रस्तांना शासनाने भरीव मदत दिली. जेथे गारपीट झालीे त्या भागातील शेतकर्‍यांबरोबर गारपीट न झालेल्या भागातील शेतकर्‍यांनादेखील शासनाने भरीव आर्थिक मदत देवून त्यांच चांगभलं केले. मग या खरडून गेलेल्या शेतजमीनधारकांना अजूनपर्यंंत का मदत मिळाली नाही, हा प्रश्न बर्‍याच दिवसांपासून शेतकर्‍यांना सतावत आहे. रोहणा येथील पीडित शेतकरी संजय रणनवरे यांच्या नेतृत्वात अंदाजे ५0 शेतकर्‍यांनी आर्वी येथे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन आपली कथा सांगितली. लेखी निवेदनही दिले. पण त्यांनी शासनाकडून अनुदान राशी आल्यावर त्वरीत आपल्याला वाटू असे वेळकाढू आश्‍वासन देऊन वेळ निभावून नेली पण शेतकरी आर्थिक संकटात असल्याने व पुढचा खरीप येऊन ठेपल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मदत मिळाल्यास खरिपातील बियाणे खरेदी करण्यासाठी हातभार लागला असता. पण निधी न मिळाल्याने शेतकरी आशेवर आहे.(वार्ताहर)