शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गवंडी व उमरी गावात कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: June 16, 2014 23:40 IST

तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात

कांरजा (घा.) : .तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात गवंडी व उमरीच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याची ओरड येथील नागरिक करीत आहे. सभोवतालच्या विहिरी आटल्यामुळे जनतेला दोन दोन किमी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. नियमित विद्युत पुरवठा सुरू नसल्यामुळे या कृत्रिम पाणी टंचार्ईला वीज वितरण कंपनीसुद्धा तेवढी जबाबदार असल्याची तक्रार माजी सरपंच नागोराव देवासे यांनी केली आहे.काही वर्र्षापूर्वी उमरी आणि गवंडी या दोन्ही गावांना नारा अधिक २२ या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता. परंतु तांत्रिक दोषामुळे या दोन्ही गावाला नारा अधिक २२ योजनेंतर्गत पुरेसे पाणी पोहचू शकले नाही. त्रस्त नागरिकांनी या दोन्ही गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना द्यावी अशी मागणी केली. पण ही दोन्ही गावे नारा २२ योजनेला जोडली असल्यामुळे स्वतंत्र योजना देता येत नाही असे कारण पाणी पुरवठा विभागाने पुढे केले. त्यामुळे जनतेचे हाल सुरूच राहीले.त्रस्त जनतेच्या सतत पाठपुराव्याने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गवंडी साठी २०१२-१३ तर उमरी करिता २०११-१२ मध्ये स्वतंत्र योजना मंजूर करण्यात आल्यास योजनेचे काम सुरू झाले. परंतु संबंधित अभियंत्याच्या चालढकल धोरणामुळे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे. योजनेला पाहिजे असलेला विद्युत पुरवठाही अद्याप देण्यात आला नाही. परिणामी या दोन्ही गावात भीषण स्वरूपाची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.उमरी ग्रामपंचायतकरिता राष्ट्रीय पेयजल योजना धावसा येथील तलावावरून घेण्यात आली असून गवंडीची योजना मात्र जुन्याच विहिरीवरून सुरू करण्यात आली आहे. जुनी विहीर खोल करून, जुजबी बांधकाम करून नवीन पार्ईप लार्ईन व मोटर पंप मंजूर करण्यात आला. पण अद्याप नवीन ट्रान्सफार्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स न लावल्यामुळे योजनेला वीज पुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही. येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास दोन्ही गावच्या नागरिकांना सोबत घेवून, आंदोलन करण्याचा इशारा गवंडीचे माजी सरपंच नागोराव देवासे यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)