शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

कला महोत्सव हे सांस्कृतिक सुवर्णयुग

By admin | Updated: November 18, 2014 23:01 IST

कला महोत्सव म्हणजे अस्सल कलावंताची खाण असून वर्धेच्या सांस्कृतिक पर्वाचे हे सुवर्णयूग असल्याचे मत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले. कला महोत्सवांतर्गत दादाजी धुनिवाले देवस्थान

वर्धा : कला महोत्सव म्हणजे अस्सल कलावंताची खाण असून वर्धेच्या सांस्कृतिक पर्वाचे हे सुवर्णयूग असल्याचे मत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले. कला महोत्सवांतर्गत दादाजी धुनिवाले देवस्थान ट्रस्ट व दत्ता मेघे सांयटिफिक रिसर्च अ‍ॅड डेव्हलपर्स फॉऊडेशनद्वारे आयोजित व प्रगती संगीत विद्यालयाद्वारे संयोजित विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धेदरम्यान ते बोलत होते.याप्रसंगी मोहन अग्रवाल, उत्तम गल्वाचे ओमकार घोष, कंझुमर फोरमचे अध्यक्ष चंद्रकार धीरन, अनिल नरेडी, अनवर सिद्दीकी, अशोक झाडे, अभिजीत श्रावणे, आशिष गोस्वामी, यशवंत पलेरिया, सुरेश बरे, डॉ. अलोक विश्वास, प्रशांत वकारे, आशिष मुडे, उमेश महल्ले, निलेश गावंडे, दिनेश वरटकर, शुभांगी वटे, राजेंद्र वांदिले, नलिनी चिचाटे, सुनील बुरांडे, दिलीप झाडे, जीवन बांगडे, शैलेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.१० व १५ वयोगटातील स्थानिक ७५ मुलांची पूर्वचाचणी घेऊन ३५ मुलाची निवड करण्यात आली. उर्वरित वरिष्ठ गटात मोझरी, अकोला, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, नागपूर, हिंगणघाट, चंद्रपूर, खामगाव, वर्धा, अमरावती अशा विविध ठिकानावरून ९३ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. सुफी संगीत, संताचे अंभग, फिल्मी-नॉन फिल्मी गजल, मराठी लावणी, लोकगीत गवळण, गोंधळ, जागरण, फिल्मीगीत अशा अनेक प्रकरची गाणी यात सादर करण्यात आली. माझे माहेर पंढरी, एक राधा, एक मिरा यासारख्या भक्तीगीतांनी वातावरण भक्तीमय झाले तर प्रियाविणा, तुझ्या माझ्या संसाराला या सारख्या भावगीतांनी रसिकांची दाद मिळवली. ठसकेबाज मराठी लावण्यांनी प्रेक्षकांना ढोलकीच्या तालावर झिंगण्यास भाग पाडले, तर शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती या सारख्या देशभक्ती जागवणाऱ्या गीतांनी रसिकांची दाद मिळवली.नदीच्या पल्ल्याड आईचा गोंधळ सारख्या जोगव्याने तसेच मन्नाडेंच्या सदाबहार गीतांची शृखलांच रसिकांना ऐकायला मिळाली. संवादिनीची साथ शैलेश जगताप, तबल्याची साथ अंकुश आंबटपुरे, आॅॅक्टोपॅडवर पिंटु झाडे तर आॅरगनवर अजित भालेराव यांनी साथ दिली. स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध गायक हिंडोल पेंडसे, किशोर अगडे यांनी केले. संचालन किरण पट्टेवार यांनी, यशस्वीतेकरिता दिलीप झाडे, जीवन बागडे, विनोद भोरे, नानू पांडे, रसिक जोमदे, नरेंद्र लोनकर, अनिल कुकर्डे, पवन राऊत आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)