शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अंदोरी टी पॉंईट अपघातप्रवण स्थळाची खासदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

नेहमी होणाऱ्या घटनांमागचे तांत्रिक कारण शोधण्यासोबतच उपाय काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी रस्ते महामार्गाचे प्रकल्प संचालन प्रशांत मेंढे व बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर आर.ए.त्यागी यांना सोबत आणून कामाचे निर्देश दिले. स्थानिक यशोदा नदी ओलांडून अंदोरीकडे वळणाऱ्या मार्गावर परिसरातील २२ गावे असून या सर्वांचे तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ म्हणून देवळीसोबत नाळ जुळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : आतापर्यंत ८ ते १० अपघाताला कारणीभूत ठरलेल्या तसेच रस्ता बांधकामातील तांत्रिक कारणाअभावी अडचणीच्या ठरलेल्या अंदोरी टी पॉर्इंटची खासदार रामदास तडस,राष्ट्रीय महामार्ग व बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी वारंवार होणाºया या घटनांना संबंधीत अधिकारी व त्यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला. काल परवा पुन्हा या पॉर्इंटवर ट्रॅव्हल्स अपघातात भाऊराव फटींग नामक शेतमजुराचे दोन्ही पाय निकामी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.नेहमी होणाऱ्या घटनांमागचे तांत्रिक कारण शोधण्यासोबतच उपाय काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी रस्ते महामार्गाचे प्रकल्प संचालन प्रशांत मेंढे व बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर आर.ए.त्यागी यांना सोबत आणून कामाचे निर्देश दिले. स्थानिक यशोदा नदी ओलांडून अंदोरीकडे वळणाऱ्या मार्गावर परिसरातील २२ गावे असून या सर्वांचे तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ म्हणून देवळीसोबत नाळ जुळली आहे. हा ग्रामीण रस्ता वर्दळीचा ठरला असताना प्रशासनाच्यावतीने देवळीकडे जाणाºया वळण रस्त्यावर बोगदा न देता या मार्गाची वाहतूक सरळ महामार्गावर काढण्यात आली. त्यामुळे रस्ता नियमाचे विरोधात व चुकीच्या पद्धतीने ही वाहतूक महामार्गावर येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले.दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर काल परवा झालेल्या अपघातात देवळीतील शेतमजूरांचे दोन्ही पाय निकामी होवून मृत्यूशी झुंज देत असल्याने रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या तोडग्यानुसार तात्पुरती व्यवस्था म्हणून अंदोरी टी पॉर्इंटवरून यवतमाळकडे जाणाºया महामार्गावर युटर्न देण्याचे तसेच याठिकाणी वाहतुकीचे नियमानुसार सोलर लाईट रिफ्लेक्टर, थर्माप्लॉस्टीकचे ब्रेकर बसविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच नेहमीसाठीची व्यवस्था म्हणून अंदोरी वळण रस्त्यावर उजव्या बाजूने महामार्गाला समांतर रस्ता काढून हा रस्ता स्मशानभूमीच्या रस्त्याला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रशासकीय सोपस्कार व अपेक्षीत इस्टीमेट तयार करून रस्ता बांधकाम पूर्णत्वास नेणार असल्याने खासदार रामदास तडस यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी याबाबतचे निवेदन खासदारांना व अधिकाºयांना देवून लक्ष वेधले. यवतमाळ - वर्धा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे लहान गावांना जाण्यासाठी कमालीची अडचण येत आहे. मागणीचा पाठपुरावा प्रणय जोशी, दशरथ भुजाडे, रवि कारोटकर, संजय मुजबैले, राजू झिलपे, अनिल खोंड, विनोद तेलरांधे, अंकीत टेकाडे, नरेश कारोटकर, वसंत तेलरांधे, मनोज कामडी, विजय ढाकुलरकर, वसंत घोडे, संजय सोनवने, सुनिल आजनकर व नागरिकांनी केले.