शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पशुखाद्य मिळत नसल्याने कोंबड्या मारण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

मागील तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ४०० च्यावर कुक्कूटपालन व्यावसायिक कोरोना आजारामुळे अडचणीत आले आहे. कोरोनाच्या धास्तीने तर नागरिकांनी कोंबड्यांची खरेदी देखील थांबविली आहे. तरीही काही पोल्ट्री चालकांनी पक्ष्यांचे संगोपन करणे सुरूच ठेवले होते. आता देशभरात संचारबंदी लागू झाली आहे. पोल्ट्रीमधील पक्ष्यांना खाण्यासाठी लागणारे खाद्य मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देपोल्ट्री व्यावसायिक अडचणीत । दुकानात पशुखाद्याची टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यासाठी सरकारने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या. कोरोनाच्या धास्तीने आधीच पशूपालन व्यवसाय अडचणीत आला असताना आता पशूंसाठी खाद्य खरेदी करून ते खाऊ खालणेदेखील होऊ लागले आहे. संचारबंदीत पशू खाद्याचाही मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पक्षी मारण्याची परवानगी मिळण्याबाबतचे अनेक अर्ज जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे दाखल झाले असून पशुसंवर्धन विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.मागील तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ४०० च्यावर कुक्कूटपालन व्यावसायिक कोरोना आजारामुळे अडचणीत आले आहे. कोरोनाच्या धास्तीने तर नागरिकांनी कोंबड्यांची खरेदी देखील थांबविली आहे. तरीही काही पोल्ट्री चालकांनी पक्ष्यांचे संगोपन करणे सुरूच ठेवले होते. आता देशभरात संचारबंदी लागू झाली आहे. पोल्ट्रीमधील पक्ष्यांना खाण्यासाठी लागणारे खाद्य मिळणे कठीण झाले आहे. बंदमुळे वाहतूक थांबली आहे. राज्य शासनाच्या पशूसंवर्धन आयुक्तांनी परिपत्रक काढून पशुखाद्य विक्री सुरू ठेवण्याचे आदेश दिले असले तरीही दुकानांमध्ये खाद्याचा माल नाही. त्यामुळे पक्ष्यांचे संगोपन करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री धारकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी यांच्याकडे पक्षी मारण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज दाखल केले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून याची दखल घेतल्या जात नसल्याचा आरोप पोर्ल्ट्री धारकांकडून होत आहे. खाद्य मिळत नसल्याने पक्षी जगवायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस