At the age of seventy, he started cultivating forest | सत्तरीच्या उंबरठ्यावर त्यांनी जोपासला वनसंवर्धनाचा वसा

सत्तरीच्या उंबरठ्यावर त्यांनी जोपासला वनसंवर्धनाचा वसा

ठळक मुद्दे५० वनौषधीसह द्राक्षांची बाग फुलविली : शेख बाबाचा छंद अनेकांसाठी ठरतोय प्रेरणादायी

विनोद घोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : एखादा छंद दुसऱ्यांसाठी कसा फायद्याचा ठरू शकतो याचे जिवंत उदाहरण वृद्ध शेतकरी शेख बाबा हे जोपासत असलेल्या छंदाची माहिती जाणून घेतल्यावर दिसून आले. ७० वर्ष वयाचे शेख बाबा यांच्याकडे सध्या सुमारे ५० प्रजातीच्या वनस्पती असून त्याचे संवर्धन ते करीत आहेत.
आनंदमय जीवन जगत असताना शेख बाबा यांना वेगवेगळ्या वनस्पती जोपासन्याचा आगळा वेगळा छंद जडला. शेख बाबा हे उच्च शिक्षित असून यांना वनस्पतीसह विविध क्षेत्रातील ज्ञान आहे. अशातच त्यांना वेगवेगळ्या वनस्पती जोपासण्याचा छंद जडल्याचे ते सांगतात. त्यांनी बºयाच वनस्पतीचे बिजारोपण केले. तर काही कलमांचे क्रॉस करून वेगवेगळ्या जातीच्या कलमा तयार केल्यात. हल्ली त्यांच्याकडे किमान ५० ते ५५ प्रजातींच्या वनस्पती उपलब्ध आहे. शेख बाबा यांच्याकडे प्रामुख्याने रामफळ, सिताफळ, शेवगा, पेरू, अंजीर, नारळ, फणस, लिंबू, सुईलिंबू, द्राक्षाचा वेल, वावडींग, गुलवेल, हळद, मिठा पानवेल, वांगे, टमाटर, मिरची, बारमाही फुल येणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब, जास्वंद, शेवंती सर्व बी व कलमांची नैसर्गिक पद्धतीने लावून केल्या जाते.
तसेच तुळस, आकर्षक रंगीन धोपा, कढीपत्ता, आंबे, (घुई पासून तयार केलेले) पुदीना, एप्रिल फुल, चांदनी फुल आदी वनस्पती त्यांच्याकडे आहेत. हल्ली द्राक्षेच्या वेलींना द्राक्षेचे घोस लागले आहे. यामुळे यांचा छंद परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ते बिजारोपण करून तयार झालेली रोपे इतरांनाही नि:शुल्क देत असल्याचे शेख बाबा यांनी लोकमतला सांगितले.
 

Web Title: At the age of seventy, he started cultivating forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.