शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एका चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By admin | Updated: October 3, 2014 02:03 IST

जिल्ह्यात लहान आणि अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकार दिवसागणिक वाढत आहे. मात्र यावर पोलिसांचा कुठलाही वचक राहिलेला नाही.

वर्धा : जिल्ह्यात लहान आणि अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकार दिवसागणिक वाढत आहे. मात्र यावर पोलिसांचा कुठलाही वचक राहिलेला नाही. गुरुवारी एका युवकाने एका आठ वर्षीय चिमुकलीला पळवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लहानुजीनगर येथे उघड झाली. या प्रकरणी शेख तौसीब शेख शकील (१८) याच्याविरूद्ध शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानुजीनगर परिसरात आठ वर्षीय चिमुकली तिच्या मैत्रिणीसह खेळत होती. अशातच शेख तौसीब शेख शकील हा तिथे आला. त्याने सदर चिमुकलीला मला तुझ्या वडिलाने पाठविले, तुला फुले तोडून देतो, असे म्हणत अग्रग्रामी हायस्कूल मागील परिसरातील मोकळ्या जागेवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलगी दिसत आली नाही म्हणून तिच्या कुटुुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचा शोध लागत नव्हता. अशात ती ज्या मुलींसोबत खेळत होती, त्यातील एक मुलगी घरी परत आली. यावेळी तिने एका काकाने तिला नेल्याचे सांगितले. यावरून तिचे आई-वडिल व नातेवाईक सदर परिसरात जात असताना सदर युवक चिमुकलीला परत घेऊन येत होता. तो तिला सोडून पसार होण्याच्या बेतात असताना त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी चिमुकलीच्या वडिलाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी शेख तौसीब शेख शकील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.(प्रतिनिधी)