शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीचे क्रांतीलढे पुन्हा एकदा लढून पाहू

By admin | Updated: May 17, 2017 00:41 IST

सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे.

संमेलनात कवींनी फुंकले रणशिंग : वास्तवाचे विदारक चित्र शब्दांतून केले प्रकट लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे. अशावेळी, ‘झुंज आपुली सत्यासाठी पडलो, हरलो, जरी कोसळलो, माणुसकीचे क्रांतीलढे हे पुन्हा एकदा लढून पाहू’, असे शाब्दिक रणशिंग कवींनी कवितेतून फुंकत एकूणच आजच्या विदारक परिस्थितीवर व अन्यायग्रस्ततेवर आपला आक्रोश व्यक्त केला. ज्येष्ठ कवी प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरोजनी खुरगे व दिलीप चरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित कवींनी दर्जेदार व सामाजिक आशयाच्या कविता सादर केल्या. प्रा. प्रमोद नारायणे यांनी ‘समरभूमीवर प्राण अर्पिले मागे सरलो नाही कधी स्वातंत्र्याच्या श्वासासाठी पुन्हा एकदा मरून पाहू’ ही कविता सादर केली. कवी रमेश खुरगे यांनी ‘हाडा मासांचे अंकूर पोटात ती वाढवते, मरणाच्या यातना सोसून आम्हा जग दाखविते’ अशी आईच्या वेदना व्यक्त करणारी कविता सादर केली. कवी सुनिल सावध यांनीही यावेळी बहारदार कविता सादर केली. दिलीप गायकवाड यांनी चार घडीचे जगणे जीवनास दे भरोसा, वय जगण्याचे व्हावे सत्तर म्हणायचे का? अशी जीवनावर भाष्य करणारी गझल सादर केली. संजय भगत यांनी स्वातंत्र्य आता गरिबांचे राहिले नाही, स्वातंत्र्य धनदांडग्यांचे, गरिबांसाठी काहीच नाही, अशी खंत कवितेतून व्यक्त केली. प्रा. अरविंद पाटील यांनी कवितेतून आदर्श गावाची संकल्पना मांडली. प्रशांत ढोले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाची व्यथा आपल्या कवितेतून मांडली. या कवी समंलनात तलम रेशमी साडी, मारूनी खडा कुंभ ओढशी रे सावळ्या तू भिजविले अंग, पाणी भरण्या यमूनेला जात, उठली भीतीने ही कळ सावरे आदी कवीता सादर करण्यात आल्या. गंगाधर पाटील, बबन थुल, जी.के. उरकुडे, वंदना कोल्हे, पुष्पा चौधरी, जनार्दन ददगाळे यांनीही वर्तमान काळावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कविसंमेलनासाठी डॉ. निरंजन एरकेवार, तुळशीराम वाघमारे, वीणा राऊत, अरविंद भोयर, आशा भोयर, सुषमा पिसे, मंदाकिनी एरकेवार, छाया उरकुडे, हांडे, स्रेहल हुकूम, तेजराम, अमृत चौधरी, भरत गजभिये यांच्यासह तसेच शहरातील गणमान्य व्यक्तींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कवी संमेलनाचे संचालन रामेश्वर भोपळे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार रमेश खुरगे यांनी मानले.