शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ कारवाई कायद्याच्या चौकटीतूनच

By admin | Updated: May 31, 2014 23:40 IST

तळेगाव (टा.) येथील ४७ घरांवर बुलडोजर चालला. ही कारवाई अचानक कोणताही आधार न घेता करण्यात आलेली नाही, तर ती कायद्याच्या चौकटीतूनच करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम

तळेगावचे अतिक्रमण प्रकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती वर्धा : तळेगाव (टा.) येथील ४७ घरांवर बुलडोजर चालला. ही कारवाई अचानक कोणताही आधार न घेता करण्यात आलेली नाही, तर ती कायद्याच्या चौकटीतूनच करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.तळेगावात झालेल्या अतिक्रमण हटावच्या कारवाईवरुन चांगलेच वादळ उठले आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहे. या कारवाईमागील नेमकी प्रशासनाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता  सदर बाब पुढे आली. तळेगाव(टा.) ते एकुली हा सहा कि.मी. मार्ग पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता. तत्पूर्वी तो पांदण रस्ता म्हणून होता. जिल्हा परिषदेने या मार्गाचे मालकी हक्क २00१ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले. या मार्गावर ३.७५ मीटरचे डांबरीकरण होते. हा मुख्य जिल्हा मार्ग -१९ असल्यामुळे  सर्वप्रथम दीड लाख रुपये जमा करुन भूमीअभिलेख विभागांतर्गत या जागेचे मोजमाप करण्यात आले. यानुसार महसूल विभागाने २५ मीटर म्हणजे ८0 फूट परिसरात ही शासकीय जागा असल्याची मार्किंग करुन दिलेली होती. यानुसार सुमारे एक ते दीड महिन्यांपूर्वी महसूल विभागाने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. कारवाईपूर्वी आठवडाभरापासून तीन दिवस गावात दवंडी पिटविण्यात आली. यामध्ये २६ ते ३0 मे या कालावधीत केव्हाही अतिक्रमणाची कारवाई होणार असल्याची सूचना संबंधिताना दिली होती. वास्तविक, जिल्हा परिषदेने हस्तांतरीत केलेल्या सदर जागेचा मालकी हक्क राज्य शासनाकडे देताना हा रस्ता १२ फुटाचा असल्याचे नमुद केलेले होते. या जागेवर ग्रामपंचायतीचा मालकी हक्कच उरला नव्हता. तरीही ग्रामपंचायतीने गावठाणाअंतर्गत या ठिकाणी बांधकामाची परवानगी नागरिकांना दिली. गुरुवारी २९ मे रोजी सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही कारवाई करण्यात आली. जागा २५ मीटरची असतानाही केवळ १२ मिटरचेच अतिक्रमण बुलडोजरने हटविण्यात आले.   अतिक्रमणात असलेले बांधकाम पाडताना स्लॅबला इजा पोहचणे स्वाभाविक असल्याची बाबही कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी मान्य केली. कायद्याला  बगल न देता कारवाई केल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.(जिल्हा प्रतिनिधी)