शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्याची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

By admin | Updated: July 23, 2014 00:09 IST

समुद्रपूर तालुक्यातील जांब येथील शांता पाटील यांच्या घरासमोरील नालीचे बांधकाम सहा महिन्यापासून रखडले होते. घराचे काम सुरू असतानाच ग्रा. पं. च्या वतीने नालीचे बांधकाम सुरू करून संबंधिताच्या

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील जांब येथील शांता पाटील यांच्या घरासमोरील नालीचे बांधकाम सहा महिन्यापासून रखडले होते. घराचे काम सुरू असतानाच ग्रा. पं. च्या वतीने नालीचे बांधकाम सुरू करून संबंधिताच्या घराच्या बांधकाम साहित्याची नासधूस करण्यात आली. यात त्यांचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शांता पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनानुसार समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील रहिवासी शांता पाटील यांच्या घराजवळून दोन वर्षाअगोदर नालीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. पण ते काम अपूर्ण असल्यामुळे अर्धवट खोदकाम तसेच पडून आहे.काहीच दिवसांपूर्वी शांता पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू केले. त्यामुळे घरासमोर रेती, गिट्टी विटा आदी बांधकाम साहित्य ठेवले होते. त्यातच १५ जुलै रोजी जाम ग्रामपंचायतने कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच दोन्ही बाजंूनी नाली न खोदता यांच्या घराजवळून जेसीपी लावून बांधकाम साहित्याची नासधूस केली. दुसऱ्या बाजुने नाली खोदण्यासाठी जागा असतानाही आपल्या वैयक्तिक आकसापोटी घराजवळून नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले व त्यासाठी त्यांच्या घरासमोर ठेवून असलेल्या बांधकाम साहित्याची नासधूस केल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यात त्यांचे जवळपास ४०,००० हजारांचे नुकसान झाले. या नाली बांधकामामुळे पाटील यांच्या जिन्याला भेग पडली. तसेच आटोसुद्धा तुटला. तसेच सरपंच रिना जांगळेकर यांनी पाटील यांच्या मुलाशी येऊन भांडण केल्याची आटोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे जाम ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी शांता श्यामराव पाटील यांनी गटविकास अधिकारी पं.स. वर्धा आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.(शहर प्रतिनिधी)