शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांचा आरोप; डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

संदेशचा मृत्यू डॉ. कोहळे यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी नातेवाईकांची समजूत काढत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : नजिकच्या गणेशपूर (बोरगाव) येथील युवकाचा शनिवारी सायंकाळी सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गावातील डॉक्टरने चुकीचा उपचार केल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.संदेश बन्सीलाल मोहिते (१९) रा. गणेशपूर (बोरगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी त्याला थंडी वाजून ताप आल्याने उपचाराकरिता सिंदी (रेल्वे) येथील डॉ. पुरुषोत्तम कोहळे यांच्या दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करीत त्याला इंजेक्शन व गोळा दिल्या. दोन दिवसानंतर इंजेक्शनची जागा दुखत असल्याने तो शुक्रवारी पुन्हा डॉक्टरकडे गेला आणि उपचार करुन गावाकडे परतला. मात्र, प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्याच दिवशी रात्री १० वाजता पुन्हा डॉक्टरकडे आला. दवाखाना बंद असल्याने तो दुसऱ्या डाँक्टरकडे गेला. डॉ. पालिवाल यांनी कोणताही उपचार न करताा त्याला ताबडतोब सेवाग्रामला दाखल करण्याचा सल्ला दिला. लगेच नातेवाईकांनी त्याला रात्री ११ वाजता सेवाग्रामला दाखल केले. तेथे उपचार सुरु केल्यानंतर त्याला इंजेक्शनचे इंन्फेक्शन झाल्याचे सांगून आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले.त्यामुळे संदेशला सावंगी रुग्णालयात हलविले. तेथे उपचाराला प्रतिसाद न देताच शनिवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मावळली. संदेशचा मृत्यू डॉ. कोहळे यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी नातेवाईकांची समजूत काढत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने अधिक तपास करीत आहे.त्या युवकावर मी माझ्या दवाखान्यात आल्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांनी कुठे उपचार घेतला त्याची मला कल्पना नाही. त्याचा मृत्यू स्क्रब टायफस किंवा मेंदुज्वरामुळे सुद्धा होऊ शकतो.डॉ.पुरूषोत्तम कोहळे, डॉक्टर, सिंदी (मेघे)

टॅग्स :Deathमृत्यू