वर्धा जिल्ह्यातील आष्टी-वरुड मार्गावर अपघात, एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 21:49 IST2022-06-09T21:48:41+5:302022-06-09T21:49:07+5:30
Wardha News आष्टी ते वरुड मार्गावरील साहूर लगतच्या माणिकवाडा चौरस्त्याजवळ दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला.

वर्धा जिल्ह्यातील आष्टी-वरुड मार्गावर अपघात, एक जागीच ठार
वर्धा: आष्टी ते वरुड मार्गावरील साहूर लगतच्या माणिकवाडा चौरस्त्याजवळ दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुुरुवारी रात्री घडला असून चारचाकी वाहनाचा चालक पसार झाला.
एम.एच.२७ सी.जे.६६५९ क्रमांकाच्या दुचाकीने एक व्यक्ती आष्टीकडे जात होता. यादरम्यान भरधाव येणाºया चारचाकी वाहनाने दुचाकीचाला जबर धडक दिली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. मृत साहूर येथील एका व्यक्तीचा जावई असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. वृत्तलिहेपर्यंत मृतकाचे नाव कळू शकले नाही.