शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

‘अपघात’ विमा योजनेने केला आठ शेतकऱ्यांचा ‘घात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

प्रस्ताव जिल्हास्तरीय कृषी कार्यालयातून शासनाने नेमून दिलेल्या विमा सल्लागार कंपनीकडे जातो. या ठिकाणी प्रस्तावाची छाननी होऊन पुढे तो विमा कंपनीकडे वळता केला जातो. परिपूर्ण कागदपत्रे असतील तर विमा कंपनी मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात दोन लाखांची रक्कम वळती करते. असे असले तरी आतापर्यंत ७६ पैकी केवळ २४ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवून मृतांच्या वारसाच्या बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे४४ वारसदारांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : एखाद्या शेतकऱ्याचे तसेच शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांची भरपाई देते. ही योजना लागू झाल्यापासून जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी एकूण ७६ प्रकरणे आली. पण त्यापैकी आठ प्रकरणे विमा कंपनीने अपात्र ठरविल्याने शेतकरी ‘अपघात’ विमा योजनेनेच त्या आठ कुटुंबाचा ‘घात’ केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्याला आपले आवेदन आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावा लागते. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हास्तरीय कृषी कार्यालयातून शासनाने नेमून दिलेल्या विमा सल्लागार कंपनीकडे जातो. या ठिकाणी प्रस्तावाची छाननी होऊन पुढे तो विमा कंपनीकडे वळता केला जातो. परिपूर्ण कागदपत्रे असतील तर विमा कंपनी मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात दोन लाखांची रक्कम वळती करते. असे असले तरी आतापर्यंत ७६ पैकी केवळ २४ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवून मृतांच्या वारसाच्या बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे. 

मृतांच्या वारसदाराला किती मिळते रक्कमआवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यात आलेले प्रकरण पात्र ठरल्यावर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात विमा कंपनी दोन लाखांची रक्कम वळती करीत असल्याचे सांगण्यात आले.

या वारसदारांचा प्रस्ताव केला नामंजूरआर्वी तालुक्यातील उमरी येथील मंदा धर्मराज धुर्वे, हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी येथील पुष्पा बाबाराव भुसारी, कारंजा तालुक्यातील लिंगा येथील लता शिवाजी धोंगडे, वर्धा तालुक्यातील प्रमिला शंकर भुरे, हिंगणघाट तालुक्यातील शेलापूर येथील सुधा विलास राऊत, देवळी तालुक्यातील हरलेपूर येथील सुधोदन ज्ञानेश्वर सोमकुवर, देवळी तालुक्यातील लोणी येथील माया गौतम फुलझेले तर आर्वी तालुक्यातील दिघी पानवाडी येथील भारत सदाशीव ठाकरे या वारसदाराचा प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभासाठी एकूण ७६ प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यापैकी २४ प्रस्ताव पात्र ठरवून मृतांच्या वारसाला नियमानुसार रक्कम देण्यात आली आहे. तर १५ प्रकरणे त्रुटींमुळे प्रलंबित असून २९ प्रकरणे प्रक्रियेत आहेत. आतापर्यंत आठ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरी