Accident: देवळी-सेलसुरादरम्यान पुन्हा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 00:14 IST2022-03-13T00:13:25+5:302022-03-13T00:14:24+5:30

Accident: देवळी-सेलसुरा दरम्यान भीषण अपघात झाला असून, चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर अपघात हा कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जवळ झाला आहे.

Accident: Four killed in Deoli-Selsura accident | Accident: देवळी-सेलसुरादरम्यान पुन्हा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

Accident: देवळी-सेलसुरादरम्यान पुन्हा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

वर्धा - देवळी-सेलसुरा दरम्यान भीषण अपघात झाला असून, चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर अपघात हा कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जवळ झाला आहे. सावंगी पोलीस घटनास्थळाकडे पोहोचलेले आहेत. जानेवारी महिन्यात याच मार्गावर अपघात होऊन सावंगी रूग्णालयाच्या सात भावी डॉक्टरचा मृत्यू झाला होता. 
वर्धाचे खासदार रामदास तडस सिंदी रेल्वे येथून दौरा आटोपून आपल्या देवळी  गावाकडे जात असताना त्यांना अपघात दिसला त्यांनी जखमींना सावंगी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. रानडुकरांचा कळप आडवा आल्यामुळे वाहने एकमेकांवर धडकून अपघात झाला अशी माहिती खासदार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

Web Title: Accident: Four killed in Deoli-Selsura accident

टॅग्स :Accidentअपघात