शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील ५८ हजार १८६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्यापैकी ५० हजार १८५ शेतकऱ्यांनी आधार कार्ड सलग्न केले होते. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीत करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी ४२ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीत केले होते.

ठळक मुद्देहवालदिल शेतकऱ्यांना मिळणार आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या या हेतूने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली; पण मध्यंतरी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कर्जमुक्तीसाठी महत्त्वाची प्रणाली असलेली आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया थप्प झाली होती. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा नव्या जोमाने वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सुरू झाल्याने हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील ५८ हजार १८६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्यापैकी ५० हजार १८५ शेतकऱ्यांनी आधार कार्ड सलग्न केले होते. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीत करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी ४२ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीत केले होते. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यातील ७ हजार ९०१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्याच्या विषयाला ब्रेक लागला होता.तर आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे हवालदिल शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.३८,२७३ शेतकऱ्यांनी दिली ३४३.०९ कोटींची रक्कमजिल्ह्यातील ३८,२७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ३४३.०९ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. असे असले तरी अनेकांना अजूनही कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.१,९७८ अर्जात आढळल्यात त्रुट्याऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या एकूण अर्जापैकी १ हजार ९७८ अर्जात विविध त्रुट्या असल्याचे छाणणीदरम्यान निदर्शनास आले. त्यापैकी ७२१ प्रकरणे जिल्हा समितीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी सध्या ८७ प्रकरणे प्रलंबीत आहेत. तर तालुका समितीकडे १ हजार ९८ प्रकरणे पाठविण्यात आली. त्यापैकी सध्या ७२ प्रकरणे प्रलंबीत असल्याचे सांगण्यात आले.महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज