शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

९,५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:44 PM

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे; परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रदूषणाचे एक कारण असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने....

ठळक मुद्देदोघांना ७५ हजाराचा दंड : वर्धा पालिकेच्या विशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे; परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रदूषणाचे एक कारण असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने मारोती ट्रेडींग कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी छापा टाकून कमी जाडीच्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. जप्त केलेला सदर मुद्देमाल सुमारे पाच लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.वर्धा नगर पालिकेच्यावतीने गत दोन दिवसांपासून शहरात प्लास्टिक निर्मुलनासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. पहिल्या दिवशी पालिका कर्मचाºयांनी काही छोट्या व्यावसायिकांना २० हजारांचा तर दुसºया दिवशी १५ हजारांचा दंड ठोठावला होता. आज पालिकेच्या या पथकातील कर्मचाºयांनी इतवारा बाजार परिसरात छापा टाकून एका व्यावसायिकाकडून कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या. प्लास्टिकच्या पन्नी आढळलेले हे गोदात मारोती ट्रेडींग कंपनीचे राजेश बुधवानी यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. या गोदामातून पालिकेच्या कर्मचाºयांनी सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या ९ हजार ५०० किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहे. शिवाय सदर व्यावसायिकाकडून ७० हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईपूर्वी इतवारा बाजार चौकातील हरिष धामिचा या व्यावसायिकाकडून ५ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई न.प. सीईओ अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, प्रवीण बोरकर, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, स्रेहा मेश्राम, नवीन गोन्नाडे, गुरूदेव हटवार, लंकेश गोडेकर आदींनी केली.