शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने या धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या धारवाडा व दुर्गवाडा या गावांना पाण्याचा वेढा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर धरणाचे पाणी आल्याचे दिसून येते. धारवाडा येथील दोन घरात धरणाचे पाणी घुसल्याने त्या कुटुंबांना पूनर्वसीत गावातील समाज मंदिरात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : दोन गावांना पाण्याचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : उर्ध्व वर्धा धरण प्रकल्पाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील धनोडी बदहाद्दरपूर धरण पूर्णपणे भरले आहे. जलसाठ्यात वाढ होत असल्याने या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील धारवाडा व दुर्गवाडा या गावाला पाण्याचा वेढा असून नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्ध्व वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघण्यात आले असून नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने या धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या धारवाडा व दुर्गवाडा या गावांना पाण्याचा वेढा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर धरणाचे पाणी आल्याचे दिसून येते. धारवाडा येथील दोन घरात धरणाचे पाणी घुसल्याने त्या कुटुंबांना पूनर्वसीत गावातील समाज मंदिरात हलविण्यात आले आहे. दरम्यात गावात पाणी शिरत असल्याने धारवाडा व दुर्गवाडा या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उर्ध्व वर्धा धरणाची पाणी साठवण क्षमता २८३.८० दलघमी आहे. दरम्यान सोमवारी हे धरण पूर्णपणे भरले आहे. भादोड, पिपरी व बहाद्दरपूर या गावातील काही शेतात धरणाचे पाणी जमा झाले असून शेतातील पीक पाण्यात बुडले आहे. धारोडा या गावातील तीन घरातील रामकृष्ण इंदोरे, चंद्रशेखर इंदोरे, ओंकार मेहंगे, यांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रकल्पात पाणी साठ्यामध्ये क्षणाक्षणाला वाढ होत आहे, असे सहा. अभियंता पवन पांढरे यांनी सांगितले.बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांचे २५ लाखांचे नुकसाननजीकच्या वाठोडा शिवारातील शेतकरी अतुल ठाकरे यांच्या शेताला सध्या तळ्याचे स्वरूप आले आहे. लोअर वर्धा प्रकल्पाचे बॅक वॉटर त्यांच्या शेतात शिरल्याने उभ्या पिकांना जलसमाधी मिळाली आहे. विशेष म्हजे हे शेत अधिग्रहित करण्यात आलेले नाही. ंसंपूर्ण १३ एकरातील सोयाबीन, हळद, तूर व कपाशीचे पीक सध्या पाण्यात असून संत्रा, मोसंबी आणि लिंबाच्या बगीच्यालाही तळ्याचे स्वरूप आले आहे. बॅक वॉटरमुळे ओढावलेल्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी यापूर्वी शेतकºयांने संबंधितांना निवेदन दिली आहे. परंतु, त्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविण्यात धन्यता मानली जात आहे. शासकीय मदत देण्याची मागणी आहे.देवळी तालुक्यातील २९ गावे ‘हायअलर्ट’वरपुलगाव : सततच्या पावसामुळे निम्न वर्धा धरण ९८ टक्के भरले असून सोमवारी रात्री पाणी धरणातील पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वर्धा नदीच्या काठावर असलेल्या देवळी तालुक्यातील २९ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणपातळी २८३.६३० मि.मी. असून धरण ९८ टक्के भरले आहे. निम्न वर्धा प्रकल्पातून ९० घनमीटर प्रतिसेकंद याप्रमाणे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात होत आहे. शिवाय ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता वर्धा नदीच्या काठच्या शिरपूर, खाडा, अंदोरी, कांदेगाव रोहिणी, तांबा, हिवरा, सावंगी (ये.) बाबुळगाव, निमगव्हाण, बोपापुर, आंजी (लहान), दहेगाव (धांदे), आपटी, नांदगाव, कवडगाव, वाघोली, पुलगाव या १९ गावाव्यतीरिक्त वर्धा नदीशी संलग्न असणाºया यशोदा नदी काठावरील दिगडोह, दिघी, बोपापूर, आलोडा, सरुळ, बोरगाव, टाकळी (ब), जामणी, कोल्हापूर,(सि.) या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Damधरण