शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

७९ गावांत फवारणी

By admin | Updated: September 20, 2014 23:55 IST

जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे.

वर्धा : जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. यात मलेरीया विभागाच्यावतीने ७९ गावांत फवारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून या आजारावर प्रतिबंध लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत एकूण १४२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय डेंग्यूचे १०२ रुग्ण असल्याचे तपासणीत समोर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मलेरियाच्या फवारणीतून डासांवर प्रतिबंध लाावण्याचा प्रशासनाचा उद्देश आाहे. मात्र यातून हे साध्य होणे शक्य नाही. यात नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात वाढत्या रोगाच्या प्रतिबंधावर आळा घालण्याकरिता २४ आरोग्य केंद्रांतर्गत ७९ गावात फवारणीचे काम सुरू आहे. या गावांंची लोकसंख्या ७५ हजार ४६४ आहे. ज्या भागात फवारणी करण्यात येत आहे त्या गावात या रागाचे रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. याच कारणाने या गावात ही फवारणी सुरू आहे. या फवारणीचा लाभ जिल्ह्यात हिवताप पसरविणाऱ्या डासांवर होणार आहे. हिवतापावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याकरिता कर्मचाऱ्यांच्या पाच चमू कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या तुलनेत हिवतापाचे रुग्ण कमी आहेत. मात्र याचा त्रास त्यांना कमी होण्याकरिता ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)