शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

आंजी ग्रा.पं.करिता ७५ टक्के मतदान

By admin | Updated: April 18, 2016 04:27 IST

वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी), पवनूर व पुजई येथे पोटनिवडणूक होती. याकरिता रविवारी मतदान झाले. यात आंजी

आंजी (मोठी) : वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी), पवनूर व पुजई येथे पोटनिवडणूक होती. याकरिता रविवारी मतदान झाले. यात आंजी ग्रामपंचायतीत एका वॉर्डाकरिता ७५ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. येथे एकूण १,१६१ मतदानापैकी ८६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वॉर्ड क्रमांक १ मधील सुनील सावळे यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत सत्ताधारी गटाचे अशोक बोरसरे तर विरोधी गटाचे दीपक बावणकर याच्यात सरळ लढत झाली. असे असले तरी येथे सरपंच जगदीश संचेरीया विरूद्ध माजी सरपंच दीपक बावणकर अशी अप्रत्यक्ष लढत होती. यात दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला होती.
मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रावर प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या एकाच्या मतदानावरून दोन्ही गटातील उमेदवारांच्या प्रतिनिधीमध्ये शाब्दीक चकमक झाली. निवडणूक अधिकाऱ्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद राऊत, जमादार दिनेश गायकवाड, शिपाई वैभव चरडे, घवघवे यांच्या मध्यस्थीने वाद निवळला. यामुळे पोलिसात कुठलीही तक्रार करण्यात आली नाही.(वार्ताहर)

पवनूर येथे ६९.४२ टक्के मतदान
४पवनूर येथे केशव कडू यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत ६९.४२ टक्के मतदान झाले. यात ५०७ पैकी ३५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे सत्तापक्षाचे सुभाष कडू व लक्ष्मण कोंडलकर यांच्यात सरळ लढत आहे.
पुजई येथे ७२.२२ टक्के मतदान
४पुजई ग्रा.पं.करिता ७२.२२ टक्के मतदान झाले. येथे २८८ पैकी २०८ नागरिकांनी मतदान केले. येथे शांततेत मतदान झाले.