73 thousand farmers suffer due to no link to Aadhaar account | आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत
आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

वर्धा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. या योजनेत वर्धा जिल्ह्यात १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी लाभार्थी म्हणून करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील ७३ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांना या योजनेचा लाभच मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
 
वर्धा जिल्ह्यात १ लाख १३ हजार १३ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र आहे. यापैकी ३९ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते मोबाईल क्रमांक, आधार याच्याशी लिंक करण्यात आले आहे. या शेतक-यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये प्रत्येकी २ हजार प्रमाणे तीन टप्प्यात दिले जात आहे. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी या योजनेच्या लाभासाठी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पीएम किसान पोर्टल येथे हे नावे नोंदविले. यापैकी ७३ हजार ५८७ शेतक-यांचे बँक खाते, मोबाईल क्रमांक, आधारशी लिंक झालेले नाहीत. त्यामुळे केवळ ३९ हजार ४१८ शेतक-यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.
-----
सेवा केंद्रात लिंकचे काम युद्धपातळीवर चालणार
जिल्ह्यातील लाभ न मिळालेल्या ७३ हजार ५८५ शेतक-यांची संख्या लक्षात घेऊन आता बँक खाते, मोबाईल क्रमांक व आधार याच्याशी लिंक करण्याचे आदेश सेवा केंद्रांना प्रशासनाने दिले आहे. त्या दृष्टीने सर्व तहसीलदार व महाऑनलाइनचे समन्वयक शेतक-यांचे बँक खाते लिंक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सदर कामाला गती देण्याच्या दृष्टीने कृषी आयुक्तांनीही जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

English summary :
PM Kisan Yojana : The central government announced before the Lok Sabha elections that the government would pay Rs. 6000 per year to farmer. As per information, 73 thousand 418 farmers didn't link bank account to aadhar account. So, hey have not got the benefit of the scheme.


Web Title: 73 thousand farmers suffer due to no link to Aadhaar account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.