शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

‘अप-डाऊन’ करणारे ७० कर्मचारी ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

‘स्टिंग ऑपरेशन’ करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत सोमवारी नागपूर, यवतमाळ व अमरावती या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर उपस्थित राहून ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घेतली आहे. त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना आता जिल्ह्यातच लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यासोबतच त्यांच्याविरुद्ध कारवाईचाही बडगा उगारल्याने ये-जा करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

ठळक मुद्देतपासणी नाक्यावर केली नोंदणी : विभागीय चौकशीसह गुन्हा नोंदविण्याची होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या आपत्तीकाळात मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही कोरोनाबाधित जिल्ह्यातून अप-डाऊन करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लोकमतने ‘स्टिंग ऑपरेशन’ करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत सोमवारी नागपूर, यवतमाळ व अमरावती या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर उपस्थित राहून ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घेतली आहे. त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना आता जिल्ह्यातच लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यासोबतच त्यांच्याविरुद्ध कारवाईचाही बडगा उगारल्याने ये-जा करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.जिल्ह्यात कोरोनाला रोखण्याकरिता युद्धपातळीवर कार्य सुरु आहे. अशातच लगतच्या जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने अमरावती, यवतमाळ व नागपूर या तिन्ही जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहे. तरीही या आदेशाला केराची टोपली दाखवत ये-जा सुरुच होती. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात वर्धा-नागपूर मार्गावरील सेलडोह, वर्धा-अमरावती मार्गावरील पुलगाव व वर्धा-यवतमाळ मार्गावरील शिरपूर या जिल्ह्याच्या सीमांवरील तपासणी नाक्यासह शहरालगतच्या सालोडा टी-पॉईन्ट, शांतीनगर व पवनार येथे तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांच्या पथकाने अप-डाऊन करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना रोखले. त्यांच्या नावाची नोंद करुन घेत आरोग्य तपासणी करुन त्यांना आता जिल्हा मुख्यालयी राहण्याची तंबी दिली असून ज्यांची आवश्यकता नाही अशांना परत पाठविण्यात आले. विशेषत: यवतमाळकडून येणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी नाक्यावरील तपासणी पाहून पोबारा केला. या पथकांना नागपूर, अमरावती व यवतमाळ या कोरानाबाधित जिल्ह्यातून येणारे तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी आढळून आले. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी हे नागपुरातून अवागमन करणारे आहेत. यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी आपत्तीकाळात नियमांचे उल्लंघन करीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सेवा अधिनियम अंतर्गत कारवाई सोबतच विभागीय चौकशी व गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.या अधिकाºयांनी बजावली कामगिरीनागपूर या कोरोनाबाधित जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने सेलडोह येथील तपासणी नाक्यावर खुद्द उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक सुनील गाढे, वर्ध्याचे नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार, पुरवठा निरीक्षक प्रज्वल पाथरे तर पुलगाव येथील तपासणी नाक्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या नेतृत्वात पुलगावचे पोलीस निरीक्षक गायकवाड, नायब तहसीलदार राठोड तसेच शिरपूर येथील नाक्यावर देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि वर्ध्यातील सावंगी टी-पॉर्इंटवर वर्ध्याच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी कामगिरी बजावून अप-डाऊन करणाºयांना अटकाव केला.या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा सहभागजिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासणी मोहिम राबवित कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. यादरम्यान शासकीय, निमशायकीय तसेच बँकेचेही अधिकारी व कर्मचारी आढळून आले. यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालय, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय सेलू, राज्य उत्पादन शुक्ल विभाग, महावितरण, आनंद विद्यालय चाणकी, हिवताप अधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, नायरा कंपनी दहेगाव, एक्सीस बँक वर्धा,अलाहबाद बँक वर्धा, आयडीबीआय बँक वर्धा, सेंट्रल बँक वर्धा, आय.ओ.बी.ई.इंजिनिअरींग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा न्यायालय, भु.सं.विभाग यंत्रणा कार्यालय, अग्निशमन विभाग, एच.पी.गॅस एजंन्सी, समृद्धी महामार्ग, महालक्ष्मी कंपनी देवळी, प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सीबीआय, कुंभलकर समाजकार्य महाविद्याल, आरोग्य विभाग व पशु वैद्यकीय विभाग, या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या