शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

वर्धा जिल्ह्यातील ७० टक्के जलाशयांत पाणी ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 1:51 PM

वर्धा जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांनंतर बोर प्रकल्पाची तीन दारे खुली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपल्बध झाला असून तब्बल पाच जलाशये १०० टक्के भरली आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी देखील सध्या अतिपावसाच्या रिपरिपीने चिंतातूर झाला आहे. जूनमध्ये पावसाने उसंत घेतली असल्याने कापूस , सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. तर काहींची पीके मृतावस्थेत गेली होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसाने अनेक दिवस नागरिकांना सुर्यदर्शनही झाले नाही. अशातच अंकुरलेल्या पिकांवर रोगाचे देखील सावट आले आहे. सोबतच नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

मागील अनेक वर्षानंतर बोलधरण जलाशय ८६.६० टक्के भरले आहे. बोर धरणाची पाणी पातळी ३३०.४० मीटर ऐवढी असून त्यापैकी आता ३२८.९० एवढ्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या जलाशयांपैकी धामनदी प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, वर्धा कारनदी प्रकल्प ही सहा मोठी जलाशये शंभर टक्के भरली आहेत. शेतकऱ्यांना रब्बी पीके घेताना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक भागात पाणी पातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा समाना करावा लागणार नसून यावर्षी उन्हाळयात पाण्याचे चटके सहन करावे लागणार नसल्याचे चित्र आहे.

आपत्ती व्यवस्थापन समिती सज्जमागील काही वर्षांपूर्वी बैल पोळ्याच्या दिवशी बोरधरण प्रकल्पाच्या काही कर्मचाऱ्यांच्या अनावधानाने बोर जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पुरपरिस्थिती निर्माण झाली होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती न होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती युद्धस्तरावर काम करण्यासाठी यावेळी सज्ज होती.

१० मध्यम जलाशयांत १०० टक्के पाणीसाठावर्धा जिल्ह्यात २० मध्यम जलाशये असून त्यापैकी कवाडी, लहादेवी, अंबाझरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा, आष्टी, परसोडी आणि हराशी हे तब्बल १० मध्यम जलाशये १०० टक्के भरले आहेत. तर टकाळी (बोरखेडी), मलकापूर, पिलापूर, उमरी ही चार जलाशये शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण