शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धा धरणात २९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:15 IST

दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देमृत जलसाठा ओलांडतोय खालची पातळी : हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. विशेषत: मृत जलसाठा आतापासूनच अधिक खालची पातळी गाठत असल्याने ऐन हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर बनली आहे.अप्पर वर्धा धरण आष्टी तालुक्याची शान आहे. १९९० पासून या ठिकाणी कधीही पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने धरणामध्ये जलसाठा झाला नाही. दरवर्षी धरणाचे १३ दरवाजे उघडून पाणी सोडल्या जात होते. मात्र यावर्षी धरणाच्या समोरच्या भागातही काहीच पाणी नसल्याने कोरडाठण पाहायला मिळतो. या धरणामधून उर्ध्व वर्धा, डावा कालवा अंतर्गत ३४ कि.मी. पर्यंत पाणी पुरविल्या जाते. शेतकºयांना रब्बी पिकासाठी हे धरण वरदान ठरत होते. पण, आता पाण्याअभावी सिंचनाची गैरसोय निर्माण झाली आहे. यावेळी खरीपासाठी पहिली पाण्याची पाळी सोडली तेव्हा नसल्यासारखेच पाणी शेतात पोहचले आहे.आष्टी तालुक्यातील २७ गावांना या पाण्याचा लाभ मिळत होता. शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. बेलोरा, खंबीत, अंतोरा, माणीकनगर, देलवाडी, जोलवाडी, अंबीकापूर, लहान आर्वी, लिंगापूर, जैतापूर, किन्हाळा, आष्टी, नविन आष्टी, पेठ अहमदपूर, आनंदवाडी, खडकी, चिंंचोली, वाघोली, सिरसोली, भारसवाडा, चिस्तूर, नरसापूर, सुजातपूर, शिरकुटणी, तळेगाव, खडका, बेलोरा (खुर्द) अशा एकूण २७ गावांना धरणाच्या पाण्यामुळे चांगली व्यवस्था होती. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये वडाळा, वर्धपूर, झाडगाव, सत्तारपूर येथील शेतकºयांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या जमिनीवर काही शेतकरी पीक घेत होते. खरीप वगळता रब्बी पिकाचा जास्त फायदा व्हायचा. पण, यावर्षी येथेही सिंचनाचा काहीसा फटका बसत आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यात एप्रील महिन्याची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या वैरणाचा व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनणार आहे.अप्पर वर्धा धरणाच्या संचयीत पाणी साठ्यातील घट लक्षात घेता धरण विभागाने पाणी कपात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरळीत असलेली पाण्याची साखळी यावर्षी कोलमडली असून सर्वांनाच धक्का देणारी आहे. धरणाच्या परिसरात असलेले पाण्याचे ठिकठिकाणचे लहान डोह सुध्दा संपुष्टात आले आहे. येत्या दिवसात ही स्थिती आणखी भीषण होईल.