२६ हजार ग्राहकांकडून २.६५ कोटींचा ऑनलाईन भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:13+5:30

अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सज्ज आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर वाढला असल्याने या काळात शेगडी, हिटर, एसी यासारख्या जादा वीज लागणाऱ्या उपकरणांमुळे वीज वाहिन्या अतीभारीत होऊन शॉर्ट सर्किट होणे एखाद्या वेळेस परिसरातील रोहित्रही निकामी होऊ शकते, या संपूर्ण बंदीत विद्युत रोहित्र वेळेवर दुरूस्त करून मिळणे कठीण आहे.

2.65 crore online payment from over 26,000 customers | २६ हजार ग्राहकांकडून २.६५ कोटींचा ऑनलाईन भरणा

२६ हजार ग्राहकांकडून २.६५ कोटींचा ऑनलाईन भरणा

Next
ठळक मुद्देवर्धा उपविभागातील माहिती : सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे महावितरणचे आवाहन

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मार्च महिन्यात वर्धा विभाग परिमंडळातील २६ हजार ४२१ पेक्षा जास्त वीज ग्राहकांनी आपल्या घरूनच आॅनलाईन दोन कोटी ६५ लाख रूपयांच्या वीज बिलांचा भरणा केला. त्यामुळे महावितरण कार्यालयात येऊन केवळ गर्दी करणेच टाळले नाही तर स्वत:सोबत त्यांनी इतरांच्याही सुरक्षेची काळजी घेतली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा एकटवल्या असतानाच, नागरिकांना आपल्या घरातच थांबता यावे, टीव्ही, फॅन, यासारख्या इत्यादी विजेवर चालणाऱ्या साधनांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच कोरोनाविरूद्धच्या या लढाईत हॉस्पिटलचा वीज पुरवठा अखंडित राहावा यासाठी महावितरणचे सैनिकही कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीत आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून अखंडित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे.
महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांनी वर्धा शहरतील सहा हजार ३७० ग्राहकांनी ९२ लाखांचा ऑनलाईन वीजबिल भरणा केला आहे. ग्रामीण उपविभागात १ मधील ५ हजार ७०५ ग्राहकांनी ५३ लाख रूपये, ग्रामीण उपविभाग २ मधील पाच हजार ८१३ ग्राहकांनी ५८ लाख रूपये, सेलू येथील चार हजार ८१९ ग्राहकांनी ३१ लाख रूपयांचा तर देवळी विभागातील तीन हजार ७१० ग्राहकांनी ३० लाख रूपयांचा घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरणा करून २१ दिवसीय संपूर्ण लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
क्रेडीट कार्ड वगळता अन्य पयार्यांद्वारे ऑनलाईन वीज बिल भरणा नि:शुल्क करण्यात आला असून ०. २५ टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे वीज बिल भरण्याची सोय करण्यात आली आहे.

ऑनलाईन बिल भरणा झाले नि:शुल्क
क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइनचे उर्वरित सर्व पर्याय आता नि:शुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीज बिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून होणारा वीज बिल भरणा आता नि:शुल्क करण्यात आलेला आहे.

नागरिकांनी विजेचा अनावश्यक वापर टाळावा
अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सज्ज आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर वाढला असल्याने या काळात शेगडी, हिटर, एसी यासारख्या जादा वीज लागणाऱ्या उपकरणांमुळे वीज वाहिन्या अतीभारीत होऊन शॉर्ट सर्किट होणे एखाद्या वेळेस परिसरातील रोहित्रही निकामी होऊ शकते, या संपूर्ण बंदीत विद्युत रोहित्र वेळेवर दुरूस्त करून मिळणे कठीण आहे. त्यामुळे या काळात अनावश्यक विजेचा वापर टाळावा असे आवाहन, महावितरणकडून करण्यात येत आहे.

Web Title: 2.65 crore online payment from over 26,000 customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.