शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१६२ शाळांमधून घेतले २१ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण

By admin | Updated: May 15, 2017 00:42 IST

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरू झाली आहे. चालू शैक्षणिक सत्रात पहिली ते बारावीमध्ये सेलू तालुक्यात

शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात : चालू सत्रात जि.प. शाळेत ५,२८८ विद्यार्थी विजय माहुरे । लोकमत न्यूज नेटवर्क घोराड : विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरू झाली आहे. चालू शैक्षणिक सत्रात पहिली ते बारावीमध्ये सेलू तालुक्यात १६२ शाळांतून २१ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. येत्या शैक्षणिक सत्रात यातील विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून शिक्षकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सेलू तालुक्यात जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांसोबतच अनुदानित, विनाअनुदानित खासगी संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १०९, नगर परिषदेच्या पाच, अनुदानित २३, अनधिकृत एक, समाज कल्याण विभागाच्या अनुदानित दोन तर विनाअनुदानित एक, कायम विनाअनुदानित सहा, स्वयंचलीत नऊ, विनाअनुदान तत्वावर दोन, अशा एकूण १६२ शाळा आहेत. यात पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या १०५, पहिली ते आठवीपर्यंत ३०, पहिली ते बारावी चार, पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण देणारी एक, पाचवी ते सातवी १६, नववी व दहावी दोन, कनिष्ठ महाविद्यालय चार आहेत. यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचाही समावेश आहे. शैक्षणिक सत्र संपले असून नवे सत्र सुरू होण्याच्या मार्गावर आहे. यात कुणी पहिल्या वर्गासाठी तर खासगी शिक्षण संस्था सहाव्या वर्गासाठी विद्यार्थी मिळावे म्हणून परिसर पिंजून काढत आहे. शिक्षक संभावित विद्यार्थ्यांच्या दारावर थाप मारताना दिसून येत आहेत. गावोगावी कॉन्व्हेंट असले तरी नर्सरी, केजी वन व टू चा समावेश आहे. पहिलीपासून शिक्षण देणारे कॉन्व्हेंट शहरी भागात आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये होत असलेला बदल पाहता गावातील विद्यार्थी गावातच चांगले शिक्षण घेऊन पुढील शैक्षणिक वाटचाल करतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी शाळा डिजीटल होत आहेत. यामुळे जि.प. शाळांकडे पालकांचा कल वाढेल काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जि.प. शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होत आहे. याचे महत्त्व शिक्षक पालकांना समजावून सांगत आहेत. गत काही वर्षांपासून जि.प. शाळेतील विद्यार्थी संख्या घसरत असल्याने आता शिक्षकही पालकांच्या संपर्कात दिसून येत आहेत. परिणामी, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यास गावातील हायस्कूलमधील विद्यार्थी संख्या कायम राहण्यास मदत होणार आहे.