शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:18 PM

राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार तीन वर्षात ४१६ गावे जलपरिपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा ३३, सेलू २८, देवळी ३५, आर्वी १५, आष्टी १८, कारंजा २४, हिंगणघाट १५ आणि समुद्रपूर २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते सर्व घेण्यासाठी आपलीच ओंजळ खुजी पडते. यावर्षी पाऊस कमी झाला म्हणून आपण निसर्गाच्या नावाने ओरडतो. पडणाऱ्या पावसापैकी ६० टक्के पाणी हे नदी नाल्यांमार्फत वाहून जाते. म्हणूनच वाया जाणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला अडवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी अनेक उपचार कामे करण्यात आलीत.२०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसायला लागल्यावर सामाजिक संस्थाही सहभागीसाठी पुढे सरसावल्या. तसेच अनेक कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी जलयुक्तच्याकामासाठी देणे सुरू केले. शिवाय लोकांचा सहभाग वाढल्याने ही योजना खऱ्या अर्थाने लोकांची योजना म्हणून यशस्वी ठरली. यावर्षी जिल्ह्यात सरासरी पाऊस कमी असूनही एप्रिल महिन्यात सुद्धा अनेक नाल्यांमध्ये पाणी पाहायला मिळते. या पाण्यामुळे त्या भागातील भूजल पातळी कायम राखण्यास निश्चितच मदत होत आहे.जिल्ह्यात २०१५-१६ पासून सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या वर्षी २१४ गावांचा समावेश होता. यापैकी १७३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. २०१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या २१० गावांमध्ये २४३९ कामांच्या माध्यमातून सर्व गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच २०१७-१८ मध्ये निवडण्यात आलेल्या १४४ गावांपैकी ३३ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. यापैकी ३३ गावांमध्ये १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४३ गावांमध्ये ८० टक्के तर ६८ गावांमध्ये ५० टक्के काम झाले आहे. २०१७-१८ मधील सर्व शिल्लक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत. तसेच २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्ये १ मे पर्यंत लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करून कामे तात्काळ सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जलयुक्त शिवार अभियानात नालाखोलीकरणाच्या कामामुळे पांदण खराब होत असल्यास, शेतकऱ्यांना पांदण वहिवाटीसाठी सुरू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बॅरेज कम बंधारा तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्यात.यशोदा नदीचे १६० कि.मी.चे काम पूर्णयशोदा नदी खोरे पुनर्जीवन प्रकल्प जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. कमलनयन जानकीदेवी बजाज फॉऊंडेशन संस्था या कामात सहभागी आहे. यात आर्वी, वर्धा, देवळी हिगणघाट तालुक्यातील १४३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ लघु पाणलोट क्षेत्रात वाहणारी नदी व तिला संलग्नित नाल्यांचे ६३० किलोमिटरचे खोलीकरण व सरळीकरणाचे काम यामध्ये करण्यात येत आहे. यामुळे २ लक्ष ५ हजार ४३८ एकर जमिनीला फायदा होणार असून २७ हजार ९८९ शेतकरी कुटुंबाना याचा लाभ होईल.२०१६-१७ पासून या कामाला सुरूवात झाली असून सद्यास्थितीत २६३.८९ किलोमिटर पर्यंतचे काम झालेले आहे. यामध्ये ३८ लक्ष ७० हजार ५३९ घनफुट गाळ काढण्यात आला असून यामुळे ३ हजार ८७१ टी सीएम पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी २० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. याचा लाभ ८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे. तर ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. उर्वरित ३६६ किलोमिटरचे काम प्रगतीपथावर आहे.

 

टॅग्स :WaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार