शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना १५ लाख ३२ हजारांनी गंडविले

By admin | Updated: November 22, 2014 23:06 IST

येथील समतानगर, विक्रमशिलानगर, मास्टर कॉलनी व सेवाग्राम येथील नागरिकांना माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल या दोघांनी १५ लाख ३२ हजार ४०० रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली.

वर्धा : येथील समतानगर, विक्रमशिलानगर, मास्टर कॉलनी व सेवाग्राम येथील नागरिकांना माया अग्रवाल व महेंद्र अग्रवाल या दोघांनी १५ लाख ३२ हजार ४०० रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. ही तक्रार एकूण ४८ महिला व दोन पुरूषांनी केली आहे. या दोघांनी गंडविल्याची तक्रार यापूर्वी १९ महिलांनी शहर ठाण्यात केली होती. त्याचा तपास सुरू असताना पुन्हा आलेल्या तक्रारीवरून यात गंडविल्या गेलेले आणखी नागरिक असतील ु, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही तक्रार येथील सत्यमेव जयते जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष राहुलकान्त सिन्हा, विदर्भ प्रभारी सुभाष खोडके, जिल्हा अध्यक्ष वर्धा सिद्धांत कांबळे यांनी या नागरिकांसह नोंदविली. फसवणुकीची एकूण रक्कम १५ हजार ३२ हजार ४०० रुपये आहे. १८ नोव्हेंबर २०१४ ला १९ महिलांनी या दोघांपूर्वी तक्रार केली होती. त्यांची २४ लाख ३२ हजार १४५ रुपयांनी फसगत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर तक्रार स्टेशन डायरीमध्ये केली आहे. तर जुन्या तक्रारीसोबतच या तक्रारीलाही जोडण्यात येणार असल्याचे पालिसांनी सांगितले आहे. महेंद्र अग्रवाल गौरक्षण वॉर्डात राहतात. आरोपीचे अटक पूर्व जामीण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जनआंदोलनाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरात आणि शहराच्या बाहेर २०० पेक्षा जास्त महिलांना या दोघांनी फसविल्याचा आरोप सत्यमेव जयते जनआंदोलनाच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपीला ताबडतोब अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)