शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

सेवा व्यावसायिकांना १४४.३० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांची उपासमार : आता सण, उत्सवांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विवाह सोहळे, समारंभ आदी सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. परिणामी, मंगल कार्यालये, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस व इलेक्ट्रिक यासह संबंधित इतर सेवा व्यवसायही ठप्प आहेत. त्यामुळे एकट्या वर्धा जिल्ह्यात १४४ कोटी ३० लाख रुपयांच्या फटक्याने अर्थचक्र प्रभावित झाले आहे.जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी विवाह सोहळे व समारंभाला मुकावे लागले तर आता सण, उत्सवाच्या आयोजनावरही मर्यादा घालण्यात आल्याने या सेवा व्यावसायिकांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. विशेषत: या व्यवसायाशी संलग्न असलेले वाजंत्री, डोलीवाले, रांगोळी, फोटोग्राफर, ब्युटीपार्लर, वेटर, मोलकरीण, साफसफाई कर्मचारी आदींसह हजारोंचे रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आली आहे.अनेकांनी मोलमजुरीचा निवडला पर्यायजिल्ह्यातील सेवा व्यावसायिकांपैकी ७५ टक्के व्यावसायिक हे ग्रामीण भागातील असून त्यांनी या व्यवसायातून स्वयंरोजगार उभारला आहे. ते स्वत: मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस, इलेक्ट्रिकचे काम करतात. खड्डा खोदण्यापासून तर बल्ली गाडून पडदा लावण्याचेही काम ते स्वत: करीत असल्याने या लॉकडाऊनच्या काळात त्यांचास्वयंरोजगारच ठप्प पडला आहे. याचाच परिणाम या व्यवसायातील मजुरांवरही झाला आहे. मंडप कारागीर आणि या व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांना मोलमजुरी करावी लागत आहे.सेवा व्यावसायिकनिहाय झालेले नुकसानकोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात १ हजारावर असलेल्या सेवा व्यावसायिकांचे यंदा जवळपास दीडशे कोटींचे नुकसान झाले आहे. अनेकांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले असून त्यांचे हप्ते थकल्याने बँकांकडून नोटीस येत आहेत. शासनाच्या आदेशाने हप्ते थांबविण्यात आले असून व्याज मात्र, सुरूच आहे. या काळात व्याजाचेही चक्र जोरात असल्याने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. विशेषत: या व्यवसायावर अवलंबून असणाºया इतर दुर्लक्षित कामगारांचा पोटमारा झाला आहे. ग्रामीण भागात या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभारणाऱ्यांची मोठी वाताहत झाली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.संजय ठाकरे, सचिव, वर्धा सेवा समिती.