शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पोकलॅन्ड, ट्रक, ट्रेलरसह ११० ब्रास वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

हिंगणघाट तालुक्यातील कापसी शिवारात अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तीन मंडळ अधिकारी, चार तलाठी, एक शिपाई, एक कोतवाल, दोन पोलीस शिपाई तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कापसी भागात छापा टाकला असता तेथे अवैध उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ठळक मुद्देमहसूलसह वनविभागाची धडक कारवाई, वर्ध्याच्या वाळू चोरट्यांच्या अडचणीत पडणार भर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गोपनीय माहितीच्या आधारे वनविभाग तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कापसी भागातील वर्धा नदी पात्रात कारवाई करून पोकलॅन्ड, ट्रक, ट्रेलरसह ११० ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली असून सदर कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.हिंगणघाट तालुक्यातील कापसी शिवारात अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तीन मंडळ अधिकारी, चार तलाठी, एक शिपाई, एक कोतवाल, दोन पोलीस शिपाई तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कापसी भागात छापा टाकला असता तेथे अवैध उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिकारी येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एक पोकलॅन्ड, एम. एच. ४६ एच. ६००७ क्रमांकाचा ट्रेलर, एम. एच. ३१ सी. बी. २९८१ क्रमांकाचा ट्रक तसेच ११० ब्रास वाळू जप्त केली. जप्त केलेली वाहने तहसीलदार व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. अवैध उत्खन्नासह वाहूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा पोकलॅन्ड व ट्रेलर हा वर्धा येथील वाळू माफिया अभिनव कापसे यांच्या मालकीचा असल्याचे आणि जप्त करण्यात आलेला ट्रक बंडू उमाटे रा. वरूड यांच्या मालकीचा असल्याचे अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. ही कारवाई वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, हिंगणघाट येथील वनक्षेत्र सहाय्यक शेख, मंडळ अधिकारी प्रशांत निनावे, मन्नुलाल भलावी, तलाठी विलास राऊत, स्वप्निल देशमुख, प्रेमसिंग बिमरूट, दीपक अंधारे, अभिष रामटेके, धनराज झाडे, कोतवाल दिनेश कोहपरे, नय्युम शेख, गजानन काळे, सुनील पाऊलझाडे यांनी केली.जप्त केलेली वाळूची किंमत ४.१८ लाखांच्या घरातसदर वाळू माफिया वर्धा नदी पात्रातून वाळूचे उत्खनन करून त्याची साठवणूक वनविभागाच्या मालकीच्या जागेवर करीत होते. सदर कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी वाळूचे पाच ढिग जप्त केले आहे. हा वाळूसाठा सुमारे ११० ब्रास असून त्याची शासकीय किंमत ४.१८ लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.दंडही ठोठावलासदर प्रकरणात पोकलॅन्ड आणि ट्रेलर मालकांना कायदेशीर नोटीस बजावून प्रकरणात ११० ब्रास रेतीसाठी स्वामित्व धनासह प्रतीब्राससाठी २२ हजार ९०० रुपये प्रमाणे एकूण २५.१९ लाख दंड व पोकलॅन्ड मशीनसाठी जुर्माना म्हणून ७.५० लाख तसेच ट्रकसाठी २.०० लाख जुर्माना सह पोकलॅन्ड मशीन शासन जमा करण्याची कार्यवाही संबंधीतांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर करण्यात येणार आहे. तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.चार वाहनांनी काढला वर्ध्याकडे पळकारवाईसाठी अधिकाऱ्यांचे पथक आल्याची माहिती मिळताच चार डंपर चालकांनी वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. हे चारही मालवाहू वर्धा येथील वाळू माफियांचे असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांना असून या वाळूमाफियांचा शोध अधिकारी घेत आहेत. गोपनीय माहिती घेऊन या वाळू चोरट्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.