शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

न्यायालयाच्या समोर असता दोन गटात वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान त्यांनी पुढाकार घेत वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. याचवेळी वाद करणाऱ्यापैकी एकाने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने पोटे यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले.

ठळक मुद्देन्यायालयासमोरील घटना : सहा व्यक्तींना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील सिव्हील लाईन भागातील न्यायालयाच्या समोर हातात धारदार शस्त्र घेऊन दोन गटात वाद सुरू असल्याचे लक्षात येताच खाकी वर्दीत असलेले पोलीस अधिकारी पराग पोटे यांनी मध्यस्ती करीत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आरोपीने त्याच्या हातातीच शस्त्राने थेट पोलीस अधिकारी पोटे यांच्यावर वार केल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी पराग पोटे हे सध्या नागपूर येथे कार्यरत असून त्यांनी यापूर्वी सेवाग्राम ठाण्यात आणि स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सदर पोलीस अधिकाऱ्याने वेळीच मध्यस्ती केली नसती तर मोठी घटनाच घडली असती अशी चर्चा घटनास्थळी होती.वर्धा शहराशेजारील आलोडी येथे एका महिलेचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह आढळला होता. त्यावेळी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मोहन वरठी याला पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणातील साक्ष असल्याने पोलीस अधिकारी पोटे हे वर्धा येथील न्यायालयात आले होते. ते न्यायालयाच्या समोर असता दोन गटात वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान त्यांनी पुढाकार घेत वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. याचवेळी वाद करणाऱ्यापैकी एकाने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने पोटे यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. ही बाब तेथेच असलेल्या पोलीस कर्मचारी देवानंद भाजीपाले यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत काहींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. मारोती माणिक मरघडे, राखी मारोती मरघडे, सोहम अशोक ढेंगरे, मनोज मारोती मरघडे, नेहा मनोज मरघडे, सविता अशोक मरघडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस