शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

"दहशतवाद्यांना आता घरात घुसून मारलं जातं", PM नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 2:38 PM

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकले नाही, असे नरेंद्र  मोदी म्हणाले. 

हरिद्वार : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हा-जेव्हा देशात कमकुवत सरकार आले, तेव्हा देशात दहशतवाद पसरला. आज देशात मजबूत सरकार आहे, त्यामुळे आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जातं, असे नरेंद्र  मोदी म्हणाले. 

जम्मू-काश्मीरमध्ये सात दशकांपासून लागू असलेले कलम 370 हटवण्यात आले, हे मजबूत सरकारमुळे होऊ शकले, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. आज देशात एक स्थिर सरकार आहे. जनतेने या सरकारचे काम बघितले आहे. मजबूत सरकारमुळे दहशतवाद संपुष्टात आला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसचे सरकार कधीच 'वन रँक-वन पेन्शन' लागू करू शकलं नाही. मात्र आमच्या सरकारने ते लागू केले. 'वन रँक-वन पेन्शन' सैनिकांचा सन्मान आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या सरकारमध्ये जवानांच्या सुरक्षेसाठी उपकरणे नव्हती. याआधी बुलेटप्रुफ जॅकेटचीही कमतरता होती. आज आधुनिक उपकरणे आहेत. काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकले नाही. आज पाहिले तर सीमेवर आधुनिक रस्ते तयार होत आहेत. आधुनिक भूयार तयार होत आहेत. हे दशक उत्तराखंडचे असल्याचे काही दिवसांपूर्वी बाबा केदारनाथांचे दर्शन घेताना बोललो होतो, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आता काँग्रेसने हिंदू धर्मात असलेली शक्ती नष्ट करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने माता गंगेला कालवा म्हटले आहे. उत्तराखंडची आस्था नष्ट करण्याचे षडयंत्र चालवण्यात येत आहे. त्यामध्ये काँग्रेसची काही विधाने आगीत तेल ओतण्यासारखी आहेत.

विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींना काँग्रेसचा विरोधविकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींना काँग्रेसचा विरोध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, काँग्रेसने प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला. राम मंदिराला विरोध केला. राम मंदिर होऊ नये म्हणून त्यांनी शक्य तितके अडथळे आणले. यानंतरही राम मंदिर बांधणाऱ्यांनी काँग्रेसचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना अभिषेकासाठी बोलावले. पण त्यावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttarakhandउत्तराखंडharidwar-pcहरिद्वार