शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

युपीत अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सपाच्या 7 आमदारांचे भाजपा उमेदवाराला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 22:18 IST

उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या दहापैकी 8 जागांवर भाजपा, तर 2 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी.

Uttar Pradesh Rajya Sabha Election Result 2024 : आज, मंगळवार(दि.27) रोजी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या 15 जागांसाठी निवडणुका झाल्या. यूपीमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली, ज्यामध्ये भाजपचे उमेदवार 8 जागांवर तर समाजवादी पक्षाचे उमेदवार 2 जागांवर विजयी झाले. या सर्व 10 जागांसाठी 395 मतदारांनी मतदान केले आहे. 

युपी राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत आणि नवीन जैन विजयी झाले आहेत. तर, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन आणि पीडीएचे उमेदवार रामजीलाल सुमन यांनीही राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. दरम्यान, सपाचे तिसरे उमेदवार माजी आयएएस आलोक रंजन यांचा पराभव झाला आहे. 

सपा आमदारांचे भाजपला मतदानउत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागांवर निवडणूक झाली. या 10 जागांसाठी 399 पैकी 395 मतदारांनी मतदान केले. माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी महाराजी देवी मतदानासाठी आल्या नाहीत. तसेच, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केले. मिळालेल्या माहितीनुसार, सपाच्या 7 आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले, ज्यामुळे भाजपला आठ जागा मिळवण्यात यश आले.

सपामध्ये मोठा गोंधळमंगळवारी राज्यसभेच्या 10 जागांसाठी मतदान सुरू होताच समाजवादी पक्षात गोंधळ झाला. पक्षाचे चीफ व्हिप आणि उंचाहरचे आमदार मनोज पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय सपाच्या इतर चार आमदारांनीही जय श्री रामचा नारा देत क्रॉस मतदान केले. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या इतर काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले असून आता त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक