नऊ मुलाच्या आईचा स्वत:वर राहिला नाही कंट्रोल, २० वर्ष लहान तरुणासोबत...; पतीही हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:38 IST2025-09-12T14:33:19+5:302025-09-12T14:38:17+5:30
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली.

AI Image
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. नऊ मुलांची आई तिचा पती आणि कुटुंबाला सोडून २० वर्ष लहान प्रियकरासोबत पळून गेली. एवढेच नाही तर, या महिलेने घरात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि जमिनीचे कागदपत्रेही पळवून नेले. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
ही घटना उसीहाट पोलीस ठाणे परिसरातील खेडा जलालपूर गावातील आहे. संबंधित महिलेचा पती ओमपाल यांनी सांगितले की, त्यांचे लग्न ३२ वर्षांपूर्वी झाले आणि त्यांना ५ मुली आणि ४ मुलांसह एकूण नऊ मुले आहेत. त्यांच्या एका मुलाचा वयाच्या २१ व्या वर्षी आजाराने मृत्यू झाला. तर, त्यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे लग्न झाले आहे. मात्र, तरीही त्यांची पत्नी एका ३२ वर्षीय तरुणासोबत पळून गेली. शिवाय, महिलेने घरातील दागिने, रोख रक्कम आणि जमिनीची कागदपत्रेही पळवून नेल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
ओमपाल म्हणाले की, "माझा ३२ वर्षांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. मी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट केले, मुलांना वाढवले आणि माझ्या पत्नीच्या नावावर चार एकर जमीन केली. पण तिने सर्व काही धुळीत मिळवून आणि नाते तोडले."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीने तिच्यासोबत ४ लाख रुपये किमतीचे दागिने, ५०,००० रुपये रोख रक्कम आणि जमिनीची कागदपत्रे नेले. शेतातील पीक विकल्यानंतर रोख रक्कम घरात ठेवण्यात आली होती. दरम्यान, कौशल (वय, ३०), नीरज (वय, २८), प्रीती (वय, २५), गौरव (वय, २२), शिवानी (वय, १९), श्यामसुंदर (वय, १६), अखिलेश (वय, १२) आणि अंजली (वय, १०) अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. त्यापैकी तीन मुली आणि एक मुलगा विवाहित आहे. पत्नीने सर्वात धाकटी मुलगी सोबत नेली आहे.