वकील आणि त्याच्या मुलांनी केली महिला वकिलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 08:56 IST2024-09-10T08:55:44+5:302024-09-10T08:56:28+5:30

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात एका ४० वर्षीय महिला वकिलाचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका वकिलासह त्याचे तीन मुलगे आणि दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.

Uttar Pradesh Crime News: Lawyer and his sons killed woman lawyer, shocking reason revealed   | वकील आणि त्याच्या मुलांनी केली महिला वकिलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण  

वकील आणि त्याच्या मुलांनी केली महिला वकिलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण  

उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात एका ४० वर्षीय महिला वकिलाचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका वकिलासह त्याचे तीन मुलगे आणि दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. महिला वकील मोहिनी तोमर हिचं अपहरण झाल्यानंतर एका दिवसानंतर तिचा मृतदेह कालव्यात सापडला होता. या घटनेनंतर राज्यातील वकिलांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचा दबाव पोलिसांवर होता. दरम्यान, या हत्ये प्रकरणी पकडण्यात आलेला आरोपी मुस्तफा कामिल याच्या मुलाच्या जामिनास विरोध केल्याने आपल्या पत्नीला धमक्या देण्यात येत होत्या, असा आरोप या महिला वकिलाच्या पतीने केला आहे.  

मोहिनी हिचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा पती बिजेंद्र तोमर यांनी वकील मुस्तफा कामिल (६०) त्यांचा पुत्र असद मुस्तफा, हैदर मुस्तफा, सलमान मुस्तफा आणि दोन सहकारी मुनाजिर रफी आणि केशव मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली होती. 

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुस्तफा कामिल आणि त्यांच्या तीन मुलांना रविवारी अटक करण्यात आली आहे. तर रफी आणि मिश्रा यांना सोमवारी बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींनी माझ्या पत्नीला कासगंज येथील कोर्टरूमच्या बाहेर बोलावले. तसेच तिथून अपहरण केले. त्यानंतर ते तिला अज्ञात ठिकाणी घेऊन गेले आणि तिची हत्या केली, असा आरोप मृत महिला वकिलाच्या पतीने केला. 

त्यांनी आरोप केला की, एका जुन्या प्रकरणामद्ये मुस्तफा कामिल यांच्या मुलांच्या जामीन अर्जाला विरोध केल्यानंतर माझी पत्नी खूप तणावाखाली होती. आरोपींकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याची माहिती माझ्या पत्नीने मला दिली होती, असेही या महिला वकिलाच्या पतीने सांगितले. दरम्यान, कासगंजच्या एसपी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये नावं असलेल्या सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Uttar Pradesh Crime News: Lawyer and his sons killed woman lawyer, shocking reason revealed