हृदयद्रावक! झोपेतच काळाने घातली झ़डप; आईसह 5 मुलांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 09:59 IST2023-06-15T09:56:59+5:302023-06-15T09:59:46+5:30

घराला आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वेदनादायी घटनेत आईसह पाच मुलांचा होरपळून मृत्यू झाला.

uttar pradesh 6 including children died due to fire in kushinagar mourning spread in the village | हृदयद्रावक! झोपेतच काळाने घातली झ़डप; आईसह 5 मुलांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू

हृदयद्रावक! झोपेतच काळाने घातली झ़डप; आईसह 5 मुलांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. हे प्रकरण कुशीनगरच्या रामकोला नगर पंचायतीशी संबंधित आहे. बुधवारी रात्री घराला आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वेदनादायी घटनेत आईसह पाच मुलांचा होरपळून मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच टीम घटनास्थळी दाखल झाली आणि घटनेची माहिती मिळताच कुशीनगरचे डीएम, एसपी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. 

वेदनादायक घटनेची माहिती देताना जिल्हा दंडाधिकारी रमेश रंजन यांनी सांगितले की, ही घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच आगीच नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत 5 मुलांसह एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. डीएम म्हणाले की, अग्निशमन दलासह स्थानिक दल घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली तेव्हा टीमला 6 मृतदेह सापडले जे पूर्णपणे जळाले होते.

गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

पोलिसांनी सर्व 6 मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. सध्या संपूर्ण गावात शांतता आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तपासात आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी कुटुंबीयांकडून कोणावरही आरोप करण्यात आलेला नाही. आणि गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: uttar pradesh 6 including children died due to fire in kushinagar mourning spread in the village