अटल निवासी शाळेतील श्रमिकांच्या मुलांना मिळणार अत्याधुनिक शिक्षण; CM योगी आदित्यनाथ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:33 IST2025-08-26T18:24:23+5:302025-08-26T18:33:27+5:30

CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अटल आवासीय विद्यालयांसाठी एकात्मिक देखरेख प्रणालीचे उद्घाटन

UP CM Yogi Adityanath Inaugurates Integrated Monitoring System For Atal Residential Schools | अटल निवासी शाळेतील श्रमिकांच्या मुलांना मिळणार अत्याधुनिक शिक्षण; CM योगी आदित्यनाथ म्हणाले...

अटल निवासी शाळेतील श्रमिकांच्या मुलांना मिळणार अत्याधुनिक शिक्षण; CM योगी आदित्यनाथ म्हणाले...

रोजगार महाकुंभ २०२५ च्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  मंगळवारी लखनौ स्थित इंदिरा गांधी प्रतिष्ठान (Multipurpose Convention Center) येथील कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते अटल निवासी विद्यालयांसाठी (Atal Residential Schools) एकीकृत देखरेख प्रणाली पोर्टल (Integrated Monitoring System Portal) चा शुभारंभ करण्यात आला. या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील १८ अटल निवासी विद्यालयांच्या कामकाजाची, प्रगतीची, गुणवत्ता नियंत्रणाची आणि कार्यक्षमतेची देखरेख शक्य होणार आहे.  

श्रमिकांच्या मुलांसाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल

यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्रमिकांच्या मुलांना आधुनिक, दर्जेदार आणि शिस्तबद्ध शिक्षण देण्याच्या दिशेने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. ही प्रणाली अटल आवासीय विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या १८,००० मुलांना मोफत निवास, आहार व आधुनिक शिक्षण देणाऱ्या व्यवस्थेमध्ये एक क्रांतिकारी बदल घडवून आणेल.

बीओसी बोर्डशी संबंधित कामगारांच्या मुलांसाठी वरदान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अटल निवासी विद्यालये ही बीओसी (BOC - Building and Other Construction Workers) बोर्डशी संबंधित कामगारांच्या मुलांसाठी एक वरदान ठरेल. एका बाजूला कामगार मेहनत घेऊन दुसऱ्यांची घरे आणि शाळा बांधण्यासाठी घाम गाळत असताना त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही व्यथा हेरली अन् त्यांच्या पुढाकारामुळेच कामागारांच्या मुलांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी श्रम व सेवायोजन मंत्रालयाने उत्तर प्रदेशमध्ये १८ अटल निवासी विद्यालयांची स्थापना केली आहे. या विद्यालयांमध्ये  उत्कृष्ट पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण ही सर्व उत्तम व्यवस्था दिली जात आहे, जी राज्यातील इतर कोणत्याही शाळेत उपलब्ध नाही. आता त्याच धर्तीवर बेसिक शिक्षण विभागात "इंटीग्रेटेड कॅम्पस" या संकल्पनेची सुरूवात करण्यात आली आहे.
 

  •  उपस्थिती व्यवस्थापन : विद्यार्थी व शिक्षक-शाळेतील कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती रिअल-टाइममध्ये नोंदवली जाईल.
  •  शैक्षणिक देखरेख : विद्यार्थ्यांची प्रोफाइल, प्रगती, परीक्षा निकाल व रिपोर्ट कार्ड ERP प्रणालीवर उपलब्ध असतील. तसेच कमांड सेंटरमधून शिक्षणाच्या गुणवत्तेवर थेट देखरेख ठेवणही शक्य होईल.
  •  स्टाफ प्रोफाइल : शिक्षक व कर्मचाऱ्यांची सर्व माहिती प्रणालीमध्ये नोंदवलेली असेल, ज्यामुळे जबाबदारी व शिस्तबद्धता सुनिश्चित होईल.
  •  आर्थिक व्यवस्थापन : शाळेचा खर्च, अंदाजपत्रक व बिलिंगची माहिती पारदर्शकपणे ERP प्रणालीमध्ये नोंदवली जाईल.
  •  CCTV एकत्रीकरण : शाळांमधील CCTV कॅमेरे ERP प्रणालीशी जोडलेले आहेत, त्यामुळे अटल कमांड सेंटरमधून थेट (live) देखरेख करता येईल, जे सुरक्षा आणि शिस्तबद्ध असेल.
  •  विद्यार्थांचे प्रोफाइल : प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन थेट कमांड सेंटरवरून शक्य 


कामगारांसाठी 'डिजिटल न्याय सेतु पोर्टल' ची सुरुवात

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत 'श्रम न्याय सेतु पोर्टल', औद्योगिक न्यायाधिकरण वेबसाइट, आणि ई-कोर्ट पोर्टल यांची सुरूवात करण्यात आली. हा श्रमिकांच्या हितासाठी घेतलेला एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नोकरीची संधी अन् नाव नोंदणी

रोजगार महाकुंभ २०२५ च्या खास कार्यक्रमात  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते यूएई आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेल्या १५ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी ११ कंपन्यांनी सर्वाधिक नियुक्त्यांचे आश्वासन दिले आहे. यावेळी ५० हजार नोकरीच्या संधीसाठी १ लाखहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. यातील १५ हजार रिक्त जागा या आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या संधी उपलब्ध करणाऱ्या आहेत. 
 

 

Web Title: UP CM Yogi Adityanath Inaugurates Integrated Monitoring System For Atal Residential Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.