वरात पोहोचण्यापूर्वीच नवरदेवाची वहिनी नवरीच्या घरी पोहोचली; सांगते कशी, तो माझा पती आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:47 IST2024-12-06T10:46:36+5:302024-12-06T10:47:57+5:30

आता ही महिला नवरदेवाची नात्याने वहिनी आहे. हे नवरीकडच्या मंडळींना माहिती होते. पण तिने जे सांगितले त्याने नवरीकडील नातेवाईकही शॉक झाले.

trending Story The groom's sister-in-law reached the bride's house before reaching the bridegroom; says, he is my husband... | वरात पोहोचण्यापूर्वीच नवरदेवाची वहिनी नवरीच्या घरी पोहोचली; सांगते कशी, तो माझा पती आहे...

वरात पोहोचण्यापूर्वीच नवरदेवाची वहिनी नवरीच्या घरी पोहोचली; सांगते कशी, तो माझा पती आहे...

वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहेत. दिराचे लग्न ठरले होते, वरात येण्यापूर्वी त्याच्या प्रेमात असलेल्या त्याच्या वहिनीने पोलिसांना घेऊन थेट नवरीचे घर गाठले आणि वधूपक्षा कडच्यांना मोठा धक्का दिला. या प्रकारानंतर लग्न मोडण्यात आले. 

नोतनवामध्ये गोरखपूरहून वरात येणार होती. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. वधू पक्षाच्या मंडळींची वरातीच्या स्वागताची तयारी सुरु होती. तितक्यात वराची मोठी वहीनी तिथे पोहोचली. तिच्यासोबत पोलीस होते. तर घरात नातेवाईक जमलेले होते. प्रकार काय आहे हे कोणालाच समजेना. काही चूक झाली का म्हणून वधू पक्षामध्ये खळबळ उडाली होती. 

आता ही महिला नवरदेवाची नात्याने वहिनी आहे. हे नवरीकडच्या मंडळींना माहिती होते. परंतू, तिने तो नवरदेवच तिचा पती असल्याचा दावा केला. यामुळे नवरीकडील नातेवाईकही शॉक झाले. वहिनीने सांगितले की, नवरदेव माझा पती आहे. त्याच्याशी लग्न करायचा विचार सोडून द्या, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी तिने दिली. 

वहिनीचे हे शब्द ऐकून नवरीचे नातेवाईक बुचकळ्यात पडले. तयारी तर झालेली होती, आता त्याची वहीनीच त्याची पत्नी असल्याचा दावा करतेय हे पाहून त्यांनी लग्न थांबविण्याचा निर्णय घेतला.  नौतनवा पोलीस ठाण्याचे अधिकारी धर्मेंद्र सिंह म्हणाले की, ती महिला गोरखपूरच्या शाहपूर पोलिसांना घेऊन नौतनवा पोलीस ठाण्यात आली होती. त्यांनी आम्हाला जी कागदपत्रे दाखविली त्यानुसार तो विवाहित आहे. त्याच्याविरोधात डीपी अॅक्टनुसार खटलाही सुरु आहे. यामुळे हे लग्न रोखण्यासाठी पोलिसांना घेऊन ती महिला आली होती. 

Web Title: trending Story The groom's sister-in-law reached the bride's house before reaching the bridegroom; says, he is my husband...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.